Shreya Maskar
दसऱ्याला श्रीखंड पुरीचा बेत करा. श्रीखंडाची पारंपरिक रेसिपी लिहून घ्या.
श्रीखंड बनवण्यासाठी दही, साखर, बदाम, काजू, पिस्ता, वेलची पूड आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम घट्ट दही कापडात बांधून ७-८ तास पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत ठेवा.
यानंतर गाळलेले दही बाऊलमध्ये काढून चांगले फेटून घ्या.
फेटलेल्या दह्यात चवीनुसार साखर, वेलची पूड, केशर घालून चांगले मिक्स करा.
यात कापलेले बदाम, काजू आणि पिस्ता घालून मिश्रण एकजीव करा.
श्रीखंड सेट होण्यासाठी १-२ तास फ्रिजमध्ये सेट करायला ठेवून द्या.
थंडगार श्रीखंडाचा गरमागरम पुरीसोबत आस्वाद घ्या.