Shreya Maskar
गणेशोत्सवात गणपतीला नैवेद्य म्हणून ड्रायफ्रूट्स मोदक बनवा.
ड्रायफ्रूट्सचा मोदक बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्स, खजूर, किसलेले खोबरे, तूप, वेलची आणि जायफळ पावडर इत्यादी साहित्य लागते.
ड्रायफ्रूट्स मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले खोबरे घालून गोल्डन फ्राय करा.
त्यानंतर यात बिया काढलेले खजूर घालून चांगले मिक्स करा.
सर्व मिश्रण छान शिजल्यावर गॅस बंद करून वेलची आणि जायफळ पावडर मिक्स करा.
शेवटी यात बारीक ड्रायफ्रूट्सचे काप घाला.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताने त्याचे मोदक बनवा.
जर तुम्हाला मोदकाचा अचूक आकार येत नसेल तर मोदक मोल्डचा वापर करा.