Shreya Maskar
उपवासाचे मोदक बनवण्यासाठी साबुदाणा किंवा वरीचे पीठ, किसलेले ओले खोबरे , गूळ, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे कूट, मीठ, तेल इत्यादी साहित्य लागते.
उपवासाचे मोदकाचे सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये किसलेले खोबरे, गूळ, वेलची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करा.
या मिश्रणात मनुके आणि ड्रायफ्रुट्सचे काप मिक्स करा.
एका पॅनमध्ये पाणी उकळून त्यात मीठ, तेल, साबुदाणा किंवा वरीचे पीठ घालून घट्टसर उकड तयार करा.
उकडलेल्या पिठाची पारी करून त्यात सारण भरा.
आता मोदकाला छान आकार देऊन उकडून घ्या.
15-20 मिनिटांत उपवासाचे मोदक उकडून तयार होतील.
उपवासाचे मोदक खाताना आवर्जून वरून तुपाची धार सोडा.