Shreya Maskar
रव्याचे मोदक बनवण्यासाठी रवा, तूप, दूध, केसर, पिठीसाखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स इत्यादी साहित्य लागते.
रव्याच्या मोदकाचे सारण बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्स, सुकं खोबर आणि गूळ इत्यादी साहित्य लागते.
रव्याचे मोदक बनवण्यासाठी पॅनमध्ये साजूक तूप टाकून रवा खरपूस भाजून घ्या.
त्यानंतर यात दूध, तूप, केसर टाकून मंद आचेवर भाजून घ्या.
रव्याच्या मिश्रणात पिठीसाखर, वेलची पावडर घालून सगळे मिश्रण एकजीव करुन घ्या.
सगळ्यात शेवटी या मिश्रणात ड्रायफ्रूट्सचे काप घाला.
मिक्सरच्या भांड्यात ड्रायफ्रूट्स, सुकं खोबर आणि गूळ घालून मोदकाचे सारण बनवून घ्या.
आता मोदकाच्या साच्यात पहिले रव्याचे सारण टाकून त्यानंतर सुकं खोबऱ्याचे सारण भरून मोदक बनवा.