Shreya Maskar
कुकीज बनवण्यासाठी कणीक, बारीक रवा, खोबरे, मीठ, साखर, वेलची पावडर, सुकामेवा आणि तूप इत्यादी सााहित्य लागते.
कुकीज बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कणीक, रवा, खोबऱ्याचा किस, मीठ, वेलची पावडर आणि सुकामेवा एकत्र मिक्स करा.
यात तूप टाकून पीठ हाताने एकजीव करून घ्या.
दुसऱ्या बाऊलमध्ये साखर पाण्यात घालून विरघळवून घ्या.
रव्याच्या मिश्रणात साखर पाणी घालून कणीक मळा.
पिठाचे छोटे गोळे करून त्यांना कुकीजचा आकार द्या.
आता पॅनमध्ये तूप गरम करून कुकीज हलक्या हाताने तळून घ्या.
तुम्ही कुकीजवर ड्रायफ्रूट्सचे काप देखील टाकू शकता.