

Warning Signs of Type 2 Diabetes : जगभरात करोडो लोक मधुमेहाच्या समस्येशी झुंजत आहेत. या आजारामुळे शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होतो. मधुमेहाला सायलेंट किलर असेही म्हणतात. मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलिन तयार होत नसेल तर रक्तातील साखरेची पातळी वाढते.
जर परिस्थिती गंभीर झाली तर ही स्थिती व्यक्तीसाठी घातक ठरू शकते, त्यामुळे मधुमेहाच्या लक्षणांकडे (Symptoms) वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. या आजाराची लक्षणे पायांवरही दिसून येतात. खरं तर, रक्तातील साखरेची पातळी वाढली की पायाला दुखापत होण्याचा धोका वाढतो.
मधुमेहामुळे पायांना रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे पाय बधीर होतात आणि इतर अनेक समस्या उद्भवतात. चला तर मग जाणून घेऊया, रक्तातील साखर (Sugar) वाढल्यावर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसतात.
पाय दुखणे आणि सूज
जर तुम्हाला तुमच्या पायात सतत दुखणे, मुंग्या येणे, सुन्नपणा किंवा जळजळ होत असेल तर ही देखील मधुमेहाची लक्षणे असू शकतात. याशिवाय पचनसंस्था, मूत्रमार्ग, रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
पायाचे व्रण
साधारणपणे, पायांवर व्रण त्वचेतील क्रॅक किंवा खोल जखमेद्वारे ओळखले जातात. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने पायाच्या खालच्या भागात अल्सर आढळतात. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या लक्षणांकडे सुरुवातीपासूनच लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला आधीच पायात (Legs) व्रण असेल तर संसर्गावर उपचार करणे महत्वाचे आहे. तुमच्या पायात अल्सर असल्यास अनवाणी चालणे टाळा, जखमेची रोज साफसफाई करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य ठेवा.
पायांमध्ये सूज आणि लालसरपणा
मधुमेहामुळे पायात फ्रॅक्चरही होऊ शकतात. त्यामुळे पाय किंवा घोट्यात लालसरपणा, सूज किंवा इतर लक्षणे दिसू शकतात.
नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग
मधुमेही रुग्णांमध्ये नखांमध्ये बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही असतो. यामध्ये नखांचा रंग बदलणे, काळे पडणे किंवा वाकडी नखे येण्याची समस्या देखील होऊ शकते. कधीकधी दुखापतीमुळे नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग देखील होऊ शकतो. याशिवाय मधुमेहामध्ये पायांचा आकारही बदलतो.
ऍथलीट
ऍथलीट हे बुरशीजन्य संसर्ग आहे ज्यामुळे पायांना खाज सुटणे, लालसरपणा आणि क्रॅक होतात. या समस्या एका किंवा दोन्ही पायांमध्ये होऊ शकतात. या प्रकरणात, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषध घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.