Blood Pressure Risk: डायबेटीजमुळे BPचा धोका! आत्ताच या सवयी बदला, डॉक्टरांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
सध्या लोकांना डाएट फॉलो करणं आवडतं, पण बदलत्या लाइफस्टाइलमुळे ते फॉलो करणं कठीण होतं. प्रत्येकालाच आपल्या वयाच्या किमान साठीपर्यंत फिट आणि हेल्दी राहता येतं. पण चुकीच्या सवयी किंवा बदललेल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करणं फारच कठीण होऊन जातं. त्यात वेळेवर न जेवणं, बाहेरचं खाणं, सतत स्क्रिनचा वापर करणं, रात्री फोनवर असणं, झोपताना मोबाईल बघत राहणं, कमी फिरणं, व्यायाम पूर्णपणे टाळणं या सगळ्यामुळे तुम्हाला भविष्यात तुमच्या नकळत गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.
सध्या डायबेटीज असलेल्या रुग्णांमध्ये हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. शरीरातली शुगर कंट्रोल करण्याबरोबर ब्लड प्रेशरची पातळी सांभाळणं सुद्धा महत्वाचं असतं, हे अनेकजण विसरुन जातात. पण भविष्यात यामुळेच एकमेकांवर विपरीत परिणाम होत असतो आणि हृदयविकार, स्ट्रोकसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो.
कार्डिओलॉजिस्ट Dr Amit Bhushan Sharma यांच्या मते, रोजच्या रोज न चुकता रक्तदाब तपासणं आणि त्याची नोंद ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला आणि डॉक्टरांना लहान बदलही वेळेवर ओळखून त्यावर तपास करता येतो. त्यासाठी तुमच्या रोजच्या जेवणामध्ये मीठाचं प्रमाण कमी ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. कारण जास्त मीठामुळे शरीरात पाणी साठतं आणि रक्तदाब वाढतो.
तुम्ही जर डायबेटीस आणि ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर तुम्ही आहारात काही बदल करणं यामध्ये गरजेचं आहे. त्यामध्ये घरगुती जेवण सगळ्यात महत्वाचं आहे. जर बीपीचा त्रास जास्त असेल तर नाचणीची भाकरी आणि अळणी जेवण घ्या. हा सल्ला तुमच्या डॉक्टरांनाही विचारा. याने तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात फरक जाणवू शकतो. त्यासोबतच फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि कमी फॅटचे पदार्थ खा.
वजन कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. जेवणासोबत व्यायाम करणं सुद्धा महत्वाचं ठरु शकतं. जर खूप जड व्यायाम जमत नसेल तर मोकळ्या गार्डनमध्ये चाला. वेगाने किमान ३० मिनिटे चाला. याने तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसून येईल. कारण व्यायाम केल्याने शरीरातील ताण कमी होतो आणि साखरेचे नियंत्रण सुधारते. डायबेटीज आणि हाय ब्लड प्रेशर या दोन्ही समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

