Sakshi Sunil Jadhav
सध्या रिचार्जच्या किमतींमध्ये वाढ होताना पाहायला मिळतेय. त्यात सगळ्यांनाच स्वस्तात जास्तीत जास्त फायदा मिळेल असे रिचार्ज प्लान हवे असतात.
जर तुम्ही प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर फक्त किंमत नाही तर प्लानमध्ये मिळणारे फायदे समजून घेणंही खूप महत्त्वाचं आहे.
Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) या तिन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान देत आहेत.
जिओचा 349 रुपयांचा पोस्टपेड प्लान हा सध्या सर्वात किफायतशीर पर्याय आहे.
तुम्हाला या प्लानमध्ये दर महिन्याला 30GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे.
30GB नंतर जास्तीचा डेटा वापरासाठी वेगळे पैसे आकारले जाणार आहेत.
एअरटेलचा पोस्टपेड प्लान 449 रुपयांचा आहे, जो किंचित महाग आहे.
या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा 4G/5G, कॉलिंग, SMS आणि क्लाउड स्टोरेजसह प्रीमियम सर्व्हिसेस मिळतात.
एअरटेलमध्ये स्पॅम कॉल आणि मेसेज अलर्टसारख्या उपयुक्त सुविधा दिल्या जातात.
Vi चा 451 रुपयांचा प्लान 50GB डेटा देतो, जो जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. 5G उपलब्ध असल्यास अनलिमिटेड 5G आणि रात्री अनलिमिटेड डेटा सुविधा दिली जाते.