Devshayani Ekadashi 2023 : शास्त्रानुसार आषाढी एकादशी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. यंदा आषाढी एकादशी ही २९ जूनला अवघ्या महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे.
या दिवशी वारकरी सांप्रदाय हा विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला भेट देतात. या दिवसापासून भगवान विष्णूसह सर्व देव निद्रा अवस्थेत जातात तर भगवान शंकर संपूर्ण विश्वाचा भार आपल्या हातात घेतात.
असे म्हटले जाते की, भगवान विष्णूने राजा बळीला वचन दिले होते की ते पाताळ लोकात त्यांच्यासोबत राहतील. तेव्हा भगवान विष्णूनी त्यांना वरदान दिले व त्याच्यासोबत राहू लागले. असे म्हणतात की, राजा बळीने तिन्ही जगांवर अधिकार प्राप्त केला होता. त्यावेळी इंद्रदेव व सर्व देवांनी भगवान विष्णूच्या आश्रय घेतला, त्यानंतर विष्णूने वामनाचा अवतार घेऊन राजा बळीकडे भिक्षा मागितली.
भगवान विष्णूने (Vishnu) वामनाच्या रूपात बळी राजाकडे दान म्हणून तीन पावले जमीन मागितली. त्यावेळी त्यांनी पृथ्वी आणि आकाश कवेत घेतले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा नसताना बळी राजाने आपले डोके पुढे केले यावर श्रीहरी प्रसन्न झाले.
1. पातळ लोकात का गेले भगवान श्रीहरी ?
राजा बळीचे दान व भक्ती पाहून भगवान विष्णूला वरदान मागायला सांगितले. सर्वस्व दान केल्यानंतर राजा बळीने भगवान विष्णूंना सांगितले होते की, ज्याक्षणी बळी राजा डोळे उघडेल तेव्हा त्यांच्या समोर भगवान विष्णूनी हजर राहायला हवे. पाताळ लोकात गेल्यामुळे भगवान विष्णूला आपले सर्व अधिकार हे त्यागावे लागले.
2. चार महिने निद्रावस्थेत
प्रदीर्घ काळानंतरही भगवान विष्णू वैकुंठलोकात पोहोचले नाहीत तेव्हा लक्ष्मीसह (Laxmi) सर्व देवी-देवता काळजीत पडले. तेव्हा नारदजींनी माता लक्ष्मीला उपाय सांगितला. त्याच्यावर विश्वास ठेवून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी राजा बळीच्या घरी पोहोचली आणि मदतीची याचना केली. त्यांनी बळी राजाला राखी बांधून आपले भाऊ बनवले व वचन घेऊन भगवान विष्णूला पातळ लोकातून मुक्त केले.
3. बळीला दिलेले वचन पूर्ण
माता लक्ष्मीला दिलेल्या वचनामुळे राजा बळीने भगवान विष्णूंना आपल्या वरदानातून मुक्त केले. तेव्हा भगवान विष्णूंनी बळी राजाला आशीर्वाद देऊन चातुर्मासात पाताळ लोकात निवास करतील असे सांगितले. बळी राजाने सांगितले की, आता तुम्ही माझे नातेवाईक झाला आहात त्यासाठी आणखी काही काळ मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. रक्षाबंधनापासून धनत्रयोदशीपर्यंत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पाताळ लोकात वास्तव्यास होतात. म्हणूनच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून कार्तिक महिन्याच्या एकादशीपर्यंत पाताळ भगवान विष्णू चातुर्मासात पाताळलोकात योगनिद्रेत जातात.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.