Dengue Vaccine : भारताला मिळाली पहिली डेंग्यू लस, 'या' वयाच्या लोकांनाच घेता येणार डोस; जाणून घ्या सर्वकाही

Dengue Vaccine Qdenga Update : देशातील पहिल्या डेंग्यू लस ‘क्यूडेंगा’ला CDSCO ची मंजुरी मिळाली आहे. ४ ते ६० वर्षांपर्यंतच्या नागरिकांना दोन डोसद्वारे डेंग्यूच्या चारही प्रकारांपासून संरक्षण मिळणार आहे. जाणून घ्या लसीची पात्रता, फायदे आणि महत्त्वाची माहिती.
QDENGA DENGUE VACCINE APPROVED IN INDIA | CDSCO CLEARS FIRST DENGUE VACCINE FOR 4 TO 60 YEARS
QDENGA DENGUE VACCINE APPROVED IN INDIA | CDSCO CLEARS FIRST DENGUE VACCINE FOR 4 TO 60 YEARS Saam Tv
Published On
Summary
  • CDSCO ने देशातील पहिल्या डेंग्यू लस ‘क्यूडेंगा’ला मंजुरी

  • ही लस डेंग्यूच्या चारही प्रकारांपासून संरक्षण देणारी टेट्राव्हॅलेंट लस आहे

  • 4 ते 60 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना दोन डोस दिली जाणार

देशभरात २०१९ मध्ये धुमाकूळ घातलेला कोरोना आठवतोय का? या कोरोनामुळे नागरिक भयभीत झाले होते. साधा खोकला सर्दी झाली तरी घाबरायचे. यावर उपाय म्हणून सरकारने कोरोना होऊ नये म्हणून एक लस तयार केली. अशाच प्रकारची लस आता डेंग्यूसाठी देखील देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रात डेंग्यूचा धोका पुन्हा डोके वर काढतो. मच्छरांमुळे पसरणाऱ्या या आजारामुळे दरवर्षी हजारो नागरिक त्रस्त होतात. यामुळे CDSCO ने देशातील पहिली डेंग्यू लस ‘क्यूडेंगा’ (Qdenga)ला मंजुरी दिली आहे.

‘क्यूडेंगा’ ही लस जपानच्या टाकेडा कंपनीने तयार केली असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तिचे उत्पादन भारतातच होणार आहे. यासाठी टाकेडाने हैदराबादमधील बायोलॉजिकल ई कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे देशात लसीचा पुरवठा अधिक वेगाने आणि सुलभपणे होण्याची अपेक्षा आहे.

QDENGA DENGUE VACCINE APPROVED IN INDIA | CDSCO CLEARS FIRST DENGUE VACCINE FOR 4 TO 60 YEARS
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

डेंग्यूचे चार वेगवेगळे प्रकार (स्ट्रेन) असतात. क्यूडेंगा ही टेट्राव्हॅलेंट लस असल्याने ती या चारही प्रकारांपासून लागण होण्यापासून संरक्षण करते विशेष म्हणजे, यापूर्वी काही डेंग्यू लसी फक्त आधी डेंग्यू झालेल्या व्यक्तींनाच दिल्या जात होत्या. मात्र क्यूडेंगा लस डेंग्यूचा पूर्वीचा संसर्ग नसलेल्या व्यक्तींनाही देता येते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये या लसीमुळे ९० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळले आहे. तसेच डेंग्यूची गंभीर लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यासही ती उपयुक्त ठरते.

QDENGA DENGUE VACCINE APPROVED IN INDIA | CDSCO CLEARS FIRST DENGUE VACCINE FOR 4 TO 60 YEARS
New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

CDSCO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ४ वर्षांपासून ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना ही लस देता येणार आहे. या लसीचे दोन डोस दिले जातील. पहिल्या डोसनंतर तीन महिन्यांनी दुसरा डोस दिला जाईल. तज्ज्ञांच्या मते, लस ही डेंग्यूपासून संरक्षणाची ढाल आहे. मात्र घराजवळ पाणी साचू न देणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि स्वच्छता राखणे हे उपाय तितकेच महत्त्वाचे राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com