Heart Attack Death: दुर्दैवी! क्रिकेट खेळताना शिक्षकाचा मृत्यू; 32 धावा केल्या आणि बाहेर जाताच जमिनीवर कोसळला

Cricket Tragedy: क्रिकेट खेळताना 32 वर्षीय शिक्षकाचा सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू झाला. छातीत अस्वस्थता दुर्लक्षित केल्याने जीव गेला. फिटनेस असूनही हृदयविकाराचा धोका कायम असल्याचा इशारा.
Heart Attack Death
heart attackgoogle
Published On

बदलत्या जीवनशैलीमध्ये फिटनेसला प्रचंड महत्व दिलं जात आहे. सध्या लोक सोशल मीडियावरसुद्धा अनेक फिटनेस संबंधित अनेक टिप्स शेअर करत असतात. सध्याची तरुणाई फिट राहण्यासाठी मोठ-मोठ्या आणि महागड्या जीममध्ये जाताना दिसते. पण फक्त फिट राहण्यासाठी प्रत्येकालाच व्यायाम करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने फिटनेस फॉलो करायचा प्रयत्न करतो. पण यासगळ्याचा परिणाम तुमच्या हार्टवर सुद्धा होऊ शकतो. कसं हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती सविस्तर वाचा.

सध्या सोशल मीडियावर एका क्रिकेट सामन्याची चर्चा सुरु आहे. ओसीएफ स्वर्ण जयंती स्टेडियमध्ये एक भयंकर घटना घडली. तिथे खेळलेल्या एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यामध्ये 33 धावा करून परतलेल्या शिक्षकाचा सायलेंट हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे खेळाडूंना त्या शिक्षकाला होणाऱ्या वेदना किंवा त्रास तिथे ओळखता आला नाही.

Heart Attack Death
Heart Attack Risk: रात्री अचानक छातीत दुखतं, झोप येत नाही? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

मृत शिक्षकाचं नाव सोनल चंद्रा आणि वय फक्त 32 वर्षे होते. ते निगोही येथे असलेल्या राना पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. ईदच्या सुट्टीच्या दिवशी ते क्रिकेट सामना खेळण्यासाठी मैदानावर गेले होते. फलंदाजी करत असताना त्यांना छातीत थोडी अस्वस्थता जाणवत होती. पण त्यांनी ती सामान्य वेदना असेल असं समजून दुर्लक्ष केलं. 33 धावांची खेळी केली. नंतर ते बाद होऊन मैदानाबाहेर आले, तेव्हा त्यांची तब्येत जास्त बिघडली आणि ते लगेचच बेशुद्ध पडले. त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिथे सीपीआरची सुविधा नसल्यामुळे परिस्थिती जास्त गंभीर झाली.

मग त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथल्या प्राथमिक उपचारानंतरही त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली नाही. मग उपचारासाठी त्यांना बरेली येथील राममूर्ति मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांना पुन्हा एकदा तीव्रपणे हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मुळात अनेक तरुणांना फिट राहायला आवडतं. पण फक्त व्यायामुळे तुम्हाला कोणताच आजार होणार नाही, असं डोक्यात ठेवून चालणं चुकीचं ठरु शकतं. काही आजार हे शरीरात अनेक वर्षांपासून वाढत असतात. त्यांची लक्षणं ही आपल्याला रोजच्या समस्यांसाठी, दुखण्यांसारखी वाटायला लागतात. पण त्यावर वेळीच उपचार घेतले नाहीत. तर तुम्हाला कोणत्याही वयात तुमचा जीव गमवावा लागू शकतो.

Heart Attack Death
WhatsApp Update: खुशखबर! WhatsApp चॅटींगसाठी फोन नंबरची गरज नाही? वाचा नव्या फीचरची संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com