WhatsApp Update: खुशखबर! WhatsApp चॅटींगसाठी फोन नंबरची गरज नाही? वाचा नव्या फीचरची संपूर्ण माहिती

Latest Tech News: व्हॉट्सअ‍ॅप लवकरच युजरनेम फीचर आणणार असून नंबरशिवाय चॅटिंग शक्य होणार आहे. यामुळे प्रायव्हसी वाढेल, स्पॅम कमी होईल आणि युजर्सना अधिक सुरक्षित आणि सोपी कम्युनिकेशन सुविधा मिळेल.
WhatsApp update
WhatsApp updategoogle
Published On

आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे WhatsApp आहे. कारण त्यामध्ये आपल्या अनेक महत्वाच्या गोष्टी आपण साठवून ठेवतो. तसेच व्हिडीओ कॉल, चॅटींग, स्टेटससाठी, एकत्र सगळ्यांना माहिती देण्यासाठी ग्रूप यासगळ्यासाठी WhatsApp खूप फायद्याचे ठरते. त्यात नवनवीन सुविधांमुळे किंवा अपडेटमुळे WhatsAppमध्ये अनेक गोष्टी करता येऊ शकतात. आता तर चक्क तुमचा फोन नंबर नसताना तुम्ही चॅटींग करु शकता, असं नवं फीचर आणण्यात आले आहे. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

मुळात WhatsApp हवं असेल तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी आणि तुमच्याशी चॅटींग करायला मोबाईल नंबर सेव करणे महत्वाचे होते. पण लवकरच तुम्हाला नंबर शिवायही चॅटींग करता येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, WhatsApp एक नवीन फीचर आणणार आहे. त्यामध्ये युजर्स एकमेकांशी नंबर न शेअर करता थेट चॅटींग करु शकणार आहेत. हे फीचर 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने लॉन्च होण्याची शक्यता आहे.

WhatsApp update
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट

WhatsApp ने या नव्या सिस्टीमनुसार प्रत्येकाला त्याचे एक युनिक यूजरनेम देणार आहे. ही पद्धत Instagram आणि X प्रमाणे असेल. म्हणजे, जर तुम्हाला एखाद्याशी बोलण्यायचं असेल तर त्याचा फोन नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. फक्त यूजरनेम सर्च करून तुम्ही थेट त्या व्यक्तीला मेसेज करू शकता. त्यामुळे तुमचे चॅट पर्सनल राहणार आहेत.

महत्वाचं म्हणजे, हा बदल फक्त सामान्य युजर्ससाठीच नाही, तर बिझनेस अकाउंट्ससाठीही उपयोगी ठरेल. कंपन्या आपले पब्लिक यूजरनेम तयार करून त्यांच्या ग्राहकांशी सहज संपर्क साधतील. त्यामुळे कस्टमर सपोर्ट आणि मार्केटिंग जास्त सोपं होईल. पण या फीचरमुळे फोन नंबर पूर्णपणे बंद होणार नाही. अकाउंट वेरिफिकेशन आणि सुरक्षेसाठी तुमच्या नंबरचा वापर सुरूच राहणार आहे. पण तो इतर युजर्सना दिसणार नाही, हीच या फीचरची सर्वात मोठी खासियत असेल. यामुळे स्पॅम कॉल्स आणि अनोळखी लोकांकडून होणारा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.

नवीन फीचर वापरात आल्यानंतर युजर्सना स्वतःचा यूजरनेम सेट करण्याचा पर्याय मिळणार आहे. त्यानंतर कोणीही त्या यूजरनेमने त्यांना शोधू शकता. तसेच यामध्येसुद्धा प्रायव्हसी सेटिंग्जही दिल्या जातील. ज्यामध्ये कोण तुम्हाला शोधू शकतो किंवा मेसेज करू शकतो, यावर पूर्ण नियंत्रण युजरकडे असेल. यामुळे महिलांसाठी आणि व्यावसायिक वापरासाठी हे फीचर जास्त सुरक्षित असू शकतं.

WhatsApp update
Heart Attack Risk: रात्री अचानक छातीत दुखतं, झोप येत नाही? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com