Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

Coconut Water Vs Sugarcane Juice: उन्हाळ्यात शरीराची तहान भागवण्यासाठी नारळ पाणी आणि उसाचा रस पितात. उसाचा रस आणि नारळ पाणी हे दोन्ही पेय शरीरासाठी फायदेशीर असले तरी कोणते पेय शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे हे आज समजून घेणार आहोत.
 Coconut Juice Vs Sugarcane Juice
Coconut Juice Vs Sugarcane JuiceSaam TV
Published On

Coconut Water Vs Sugarcane Juice Which Is Best In Summer: मार्च महिना संपून उद्यापासून एप्रिल महिन्याला सुरूवात होणार आहे. एप्रिल महिन्यात उन्ह्याचा तडाका चांगलाच वाढला आहे अशावेळेस कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणारी आणि ऊर्जा देणारी नैसर्गिक पेय प्यायली जातात. उन्हाळ्यात शरीराची तहान भागवण्यासाठी नारळ पाणी आणि उसाचा रस पितात. उसाचा रस आणि नारळ पाणी हे दोन्ही पेय शरीरासाठी फायदेशीर असले तरी कोणते पेय शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे हे आज समजून घेणार आहोत.

 Coconut Juice Vs Sugarcane Juice
Oral health problems: सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडतंय? वेळीच व्हा सावध, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण

नारळपाणी हे शरीसाठी अमृतसमान मानले जाते. नारळपाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. उन्हाळ्यात देखील नारळ पाण्याचे सेवन केले जाते. नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते शरीराला ऊर्जा मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात नारळ पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने संपूर्ण दिवस शरीर एनर्जेटिक राहते.

नारळ पाण्यामध्ये पोटॅशियन, सोडियम आणि मॅग्नेशियम यासाखे नॅचरल गुणधर्म असतात. माहितीनुसार , नारळ पाण्यातील अँटिऑक्सिड्स शरीरातील ताणतणाव दूर करण्यास मदत करतात. ज्यांना मूत्रपिंडाशी संबंधित त्रास आहे अश्या व्यक्तींनी नियमितपणे नारळ पाणी प्यावे.

 Coconut Juice Vs Sugarcane Juice
Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

उन्हाळ्यात प्या ऊसाचा रस

उसाच्या रसमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण असल्याने शरीरासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यासाठी उसाच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरेल.

शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी झाली असेल तर तुम्ही ऊसाच्या रस पिऊ शकता. मात्र उसाच्या रसाचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने वजन देखील वाढण्याची शक्यता आहे. उसाच्या रसामध्ये लिंबू मिक्स करून प्यायल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. नियमितपणे मर्यादित प्रमाणात उसाच्या रसचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

 Coconut Juice Vs Sugarcane Juice
Sugar Side Effects: अचानक साखर खाणं सोडणं पडेल महागात, चेहऱ्यावर दिसतील हे गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

उसाचा रस की नारळपाणी शरीरासाठी अधिक काय फायदेशीर?

शरीरातील पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी नारळपाण्याचे सेवन फायदेशीर ठरेल तर शरीरातील थकवा दूर करण्यासाठी ऊसाच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर आहे.

नारळपाण्यातील पौष्टिक गुणधर्म शरीराठी उपयुक्त असल्याने कामाचा थकवा दूर करण्यासाठी नारळपाण्याचे सेवन केले पाहिजे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com