Cholesterol: LDL कोलेस्ट्रॉलपेक्षाही घातक आहे 'हा' घटक, हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी नवीन पद्धत, वाचा डॉक्टरांनी काय सांगितले

Heart Health: LDL नॉर्मल असूनही हृदयरोगाचा धोका संभवतो. ApoB ही नवी चाचणी हृदयविकाराचा धोका अधिक अचूकपणे ओळखण्यास मदत करते, असे तज्ज्ञ सांगतात.
ApoB test importance
LDL vs ApoB cholesterolgoogle
Published On

सध्या अनेकजण फीट राहण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. पण ३० ते ४० वयानंतर त्यांना अनेर गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामध्ये काही साध्या किंवा नॉर्मल वाटणारे आजार असतात. त्यामध्ये डायबेटीज, ब्लड प्रेशर, शुगर आणि हिमोग्लोबीन अशा चाचण्या लोक करतात. यातीलच एक गंभीर समस्या म्हणजे वाढता कोलेस्ट्रॉल.

आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण जंक फूड किंवा आठवड्यातून एकदा चायनीज खाणं पसंत करतात. याने तुमच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. तसेच व्यायाम टाळणं, धुम्रपान करणं यानेही कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. मग लोक डॉक्टरांकडे जाऊन याची तपासणी करतात. त्यावेळेस त्यांना LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलची चाचणी करण्याचा सल्ला देतात. पण नुकत्याच केलेल्या एका संशोधनात असं आढळलं आहे की, रक्तातील आणखी एक घटक हृदयरोगाचा धोका ओळखण्यासाठी LDL पेक्षा महत्वाचा आणि अचूक ठरू शकतो. पण ही चाचणी अजूनही नियमित तपासण्यांचा भाग नाही.

ApoB test importance
Chanakya Niti: यश, शत्रूपासून संरक्षण आणि योग्य निर्णय घेणं शिकायचंय? मग चाणक्यांचं सगळ्यात मोठं गुपित एकदा वाचाच

तज्ज्ञ म्हणतात, तुम्ही वेळेवर उपचार घेतले नाहीत तर भविष्यात तुम्हाला हार्ट अटॅकसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. दिवसेंदिवस कोलेस्ट्रॉल वाढत चालला आहे. त्यामुळे त्याची तपासणी वेळीच करुन उपचार घेणं गरजेचं आहे. या आजाराच्या चाचणीमध्ये आणखी एका चाचणी समावेश केला जातो, ती म्हणजे ‘अपोलिपोप्रोटीन बी’ म्हणजेच ApoB. हा एक प्रोटीनचा प्रकार आहे, जो रक्तामधल्या हानिकारक फॅटी कणांशी जोडलेला असतो. ApoB रेणू असल्यामुळे या चाचणीमधून प्रत्यक्षात धमन्यांमध्ये प्लाक तयार करणाऱ्या कणांची एकूण संख्या समजते.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित खडतरे यांच्या मते, फक्त LDL सामान्य असणे म्हणजे धोका नसणे असं नाही. काही वेळा LDL नॉर्मल असूनही ApoB जास्त असू शकते. याला ‘डिस्कॉर्डन्स’ असे म्हटले जाते. त्यात ज्या व्यक्तींना लठ्ठपणा, डायबेटीज किंवा ट्रायग्लिसराइड्स जास्त असतो. त्यांनी ApoB चाचणी केल्याने हृदयरोगाचा उरलेला धोका जास्त स्पष्टपणे समजतो आणि उपचाराचे निर्णय घेणं सोपं होतं.

ApoB test importance
Valentines Day Husband Gifts : नवऱ्याला द्या अंगठीच्या 'या' डिझाईन्सच्या भेट वस्तू, व्हेलेंटाईन होईल खास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com