

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्यात जास्त प्रमाण तेल, सोडा, जंक फूड, मैदा, साखर आणि जास्त मीठ अशा पदार्थांचा समावेश होत असतो. त्यामुळे शरीरात नको असलेले पदार्थ जमा होत राहतात. तसेच आत्ता लोक आळशी झालेत. त्यामुळे त्यांना व्यायामाचाही कंटाळा येतो. यामुळे नकळत शरीरात कोलेस्ट्रॉल वाढत जाते. कोलेस्ट्रॉल हे तुमच्या लिव्हरजवळ जमा होतं आणि पेशींच्या नव्या निर्मितीसाठी महत्वाचा असतो. हा पूर्णपणे वाढला तरच तो तुमच्यासाठी घातक असतो. याचे २ प्रकार HDLम्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रेरॉल.
अनेकजण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतात. मात्र काही वेळा रिपोर्ट सुधारले की किंवा तब्येत ठीक वाटू लागली की लोक ही औषधं मध्येच बंद करतात. पण असं अचानक औषधं थांबवणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. कोलेस्ट्रॉल कमी करणारी स्टॅटिनसारखी औषधं एलडीएल कमी करतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेला प्लाक लेव्हलमध्ये ठेवायला मदत करतात.
जेव्हा ही औषधं अचानक बंद केली जातात, तेव्हा एलडीएल कोलेस्ट्रॉल पुन्हा स्पीडने वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेला प्लाक अस्थिर होऊ शकतो. हा बदल बाहेरून लगेच दिसत नाही, त्यामुळे अनेकांना आपण पूर्णपणे बरे झालो आहोत असा गैरसमज होतो. पण प्रत्यक्षात यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूतील रक्तपुरवठा थांबण्याचा, म्हणजेच स्ट्रोकचा धोका वाढतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होतो, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. औषधं घेत असताना हा प्लाक स्थिर राहतो, पण औषधे बंद केल्यावर तो पुन्हा अस्थिर होऊन फुटण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, अनेकजण रिपोर्ट सुधारल्यामुळे किंवा बरेच दिवस औषधं घ्यावी लागतील या भीतीमुळे उपचार थांबवतात. पण सुधारलेले रिपोर्ट म्हणजे औषधांचा परिणाम आहे, आजार पूर्णपणे गेला आहे असं नाही. म्हणूनच, कोलेस्ट्रॉलची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही मध्येच बंद करू नका. कारण त्याचा परिणाम लगेच दिसत नसला तरी, तो हळूहळू गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि पुढे मोठ्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.