

हृदयाशी संबंधित आजारांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. जगातील अनेक मृत्यूंमागे देखील हृदयाच्या समस्या कारणीभूत आहे. यातील सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे सुरुवातीची लक्षणं अनेकदा लोक वय वाढण्याचा भाग समजून दुर्लक्ष करतात. मात्र हीच लक्षणं पुढे मोठ्या आरोग्य समस्येकडे इशारा देत असतात.
कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जन डॉ. जेरेमी लंडन यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक महत्त्वाचा इशारा दिलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, छातीत दुखणं किंवा थोडं चालल्यानंतर दम लागणं आणि थांबल्यावर लगेच आराम मिळणं हे अजिबात साधं लक्षण नाही. तर तो एक ‘रेड फ्लॅग’ म्हणजेच गंभीर संकेत असू शकतो.
डॉ. लंडन यांनी स्पष्ट केलं की, रूग्णांनी दररोजच्या साध्या कामांमध्ये दिसणाऱ्या समस्यांकडेही दुर्लक्ष करू नये. रोजच्या साध्या कामांमध्येही जर असा त्रास जाणवत असेल जसं की कचरा बाहेर टाकणं, जिना चढणं किंवा चालणं आणि त्यावेळी छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं जर तुम्हाला दिसून येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
त्यांच्या मते, जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. अशा वेळी थोडासा ताण दिला तरी शरीर लगेच संकेत देतं. पण व्यक्ती विश्रांती घेताच हृदयाची गती कमी होते आणि लक्षणं तात्पुरती कमी होतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लोकांना वाटतं की वय वाढल्यामुळे किंवा थकव्यामुळे असं होतंय. त्यामुळे ते हळूहळू आपली जीवनशैली बदलतात. विश्रांती घेतल्याने बरं वाटत असल्याने लोकं लिफ्टचा वापर करतात आणि हालचाल कमी करतात. पण डॉक्टरांच्या मते हीच सवय धोकादायक ठरू शकते, कारण शरीर आधीच इशारा देत असतं.
हृदयाचं आरोग्य दीर्घकाळ टिकवायचं असेल तर आहार आणि व्यायाम दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. फायबरयुक्त आणि इन्फ्लेमेशन करणारा आहार घ्यावा. रोजच्या आहारात भाज्या, फळं आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर नियमित व्यायामही गरजेचा आहे. एरोबिक व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा समतोल ठेवला तर हृदयाचे आजार टाळण्यास मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.