Fatty Liver Warning Signs: शरीरात ही ४ विचित्र लक्षणं दिसली तर समजा लिव्हरभोवती चरबी साठलीये!

Surabhi Jayashree Jagdish

फॅटी लिव्हर

फॅटी लिव्हरचा त्रास आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढतोय. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत त्यामुळे तो बराच काळ लक्षात येत नाही. शरीरात हळूहळू चरबी साचत गेल्याने यकृताचे कार्य मंदावते.

non alcoholic fatty liver | saam tv

फॅटी लिव्हरचा धोका

फॅटी लिव्हर हा आजार अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं न देता वाढत जातो. त्यामुळे अनेक लोकांना तो उशिरा समजतो. शरीरातील चयापचय प्रक्रिया हळूहळू बिघडू लागते. भारतात सुमारे मोठ्या प्रमाणात प्रौढांना हा त्रास असण्याची शक्यता आहे.

liver health | saam tv

सतत थकवा

फॅटी लिव्हरमध्ये सतत थकवा जाणवणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा जाणवत नाही. त्यामुळे दिवसभर आळस आणि जडपणा जाणवतो.

fat accumulation liver | saam tv

पोटाभोवती चरबी वाढणं

पोट आणि कंबरेभोवती चरबी वाढणे हे फॅटी लिव्हरचं लक्षण आहे. काही लोक बाहेरून सडपातळ दिसतात, पण पोटाचा घेर वाढलेला असतो. यामुळे चयापचय क्रिया बिघडण्याचा धोका असतो.

metabolic disorder | saam tv

उजव्या बरगडीखाली वेदना

उजव्या बाजूच्या बरगडीखाली हलका जडपणा किंवा वेदना जाणवू शकते. ही वेदना तीव्र नसते पण दाब किंवा ताण जाणवल्यासारखी वाटते. लिव्हर शरीराच्या उजव्या भागात असल्यामुळे हा त्रास तिथे जाणवतो.

liver function test | saam tv

मळमळ आणि भूक

लिव्हर नीट काम करत नसल्यास पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे हलकी मळमळ जाणवू शकते.

थोडे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी होते.

silent liver disease | saam tv

कधी तपासणी केली पाहिजे?

फॅटी लिव्हरची खात्री अल्ट्रासाऊंड किंवा लिव्हर फंक्शन टेस्टने केली जाते. घरच्या घरी फक्त लक्षणांवरून अंदाज घेता येतो, पण निदान नाही. लक्षणं सतत जाणवत असल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे.

chronic fatigue causes | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

shortness of breath symptoms | saam tv
येथे क्लिक करा