Chanakya Niti On Human Nature : या लोकांच्या कामात चुकूनही करु नका ढवळाढवळ, सुखाला लागेल ग्रहण

Chanakya Niti On Lifestyle : आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की, कोण आपल्यासोबत कसा वागेल याला काही नेम नाही.
Chanakya Niti On Human Nature
Chanakya Niti On Human NatureSaam tv
Published On: 

Chanakya Niti On People : आयुष्य म्हटलं की, सुख-दु:खाला कोणतीच परिसीमा नसते. यात अनेक चढउतार येत असतात. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की, कोण आपल्यासोबत कसा वागेल याला काही नेम नाही.

चाणक्य सांगतात की, या जगात सुखी असा कोणताच मनुष्य नाही. त्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला आनंदी राहायचे असेल तर त्याने कधीही 5 लोकांच्या कामात हस्तक्षेप करू नये. कोणकोणत्या लोकांनी त्यांच्या कामाच्या मध्ये येऊ नये ते जाणून घेऊया.

Chanakya Niti On Human Nature
Chanakya Niti On Relationship : 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा'; या 3 गोष्टींवरुन कळेल, नवऱ्याच्या दुसऱ्या अफेरबद्दल...

1. ज्ञानी लोक

आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी म्हटले आहे की जेव्हा जेव्हा दोन ज्ञानी पुरुष एकमेकांशी बोलत असतात तेव्हा कोणीही त्यांच्याजवळून जाऊ नये. असे केल्याने त्यांच्या कामात अडथळा (Problem) येतो आणि ते आपल्याला मूर्खात काढतात. शहाणा माणूस असे कधीच वागत नाही कारण त्यामुळे त्याचे अस्तित्व खराब होते.

Chanakya Niti On Human Nature
Ishita Dutta : प्रेग्नेंसीमध्ये इशिताचा चेहरा चंद्रावानी खुलला गं...!

2. नवरा बायको

पती-पत्नी हे संसाराचे चाक आहेत. चाणक्य म्हणतात की पती-पत्नी (Wife) एकत्र काही काम करत असताना त्यांनी त्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये. तसेच, ते बोलत असताना कुणी व्यत्यय आणू नये. त्यामुळे त्यांच्या नात्यात दूरावा येतो.

3. अनोळखी व्यक्ती

चाणक्य म्हणतात की, अनोळखी व्यक्तीला तितकीच मदत करा जितकी तुम्हाला जमेल. ओळख नसल्यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट ओढावू शकते. त्यासाठी त्यांना मदत करताना थोडी सावधगिरी बाळगायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.