

Relationship Tips : प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये कधी दुरावा येईल हे कुणीच सांगू शकत नाही. रुसवे-फुगवे हे प्रत्येक नात्यात येत असतात. पण ते नात्यात किती काळ ठेवायला हवे हे प्रत्येक जोडप्याला चांगलेचं ठाऊक असते.
चाणक्य म्हणतात की, कधी कधी आपल्या वागण्या-बोलण्यामुळे नात्यात दूरावा येतो. त्यामुळे पुरुष हा दुसऱ्या स्त्रीजवळ आकर्षित होतो. त्याला समजून घेणारी किंवा त्याची काळजी घेणारी तुमच्याशिवाय दुसरी कोणती व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली तर नात्याला ग्रहण लागते. यामुळे तुमच्या नात्यात दूरावा येतो. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसऱ्या स्त्रीने प्रवेश केला आहे ते ओळखायचे कसे याबाबत अनेक स्त्रियांना माहित नसते. ते कसे ओळखाल जाणून घेऊया
2. नात्यात दूरावा
शारीरिक जवळीक हा वैवाहिक जीवनाचा एक भाग आहे. कालांतराने नात्यात या गोष्टी कमी होतात. जर तुमचा होणारा स्पर्श नवऱ्याला आवडत नसले किंवा नात्यात भावनिक गोष्टीच नसतील. तुमच्या नात्यातील (Relationship) आकर्षण संपले असेल तर वेळीच सावध व्हा.
3. ऑफिसमध्ये अधिक वेळ
बरेचदा कामामुळे नवरा हा ऑफिसमध्ये अधिक काळ राहातो. परंतु, जर तो दररोज घरी उशीरा येत असेल तर पत्नींने या गोष्टीची दखल घ्यायला हवी. जर तुमचा नवरा खरचं कामात व्यस्त असेल तर त्याचे ऑफिस कॉल्स व इतर गोष्टी घरी देखील सुरु असतात पण यांच्या विरुद्ध होत असेल तर महिलांना या गोष्टींची दखल घ्यायला हवी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.