पुरुषांनो, पत्नीला 'या' ४ प्रकारच्या मित्र-मैत्रिणींपासून ठेवा दूर; अन्यथा संसार होईल उद्ध्वस्त

Chanakya Niti For Married Life :आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्यनीती' मध्ये कौटुंबिक सलोखा, प्रतिष्ठा आणि वैवाहिक जीवनातील स्थैर्य टिकवून ठेवण्याबाबत अनेक महत्त्वपूर्ण विचार मांडलेत.
CHANAKYA NITI: 4 TYPES OF INFLUENCES THAT CAN DISTURB MARRIED LIFE
CHANAKYA NITI: 4 TYPES OF INFLUENCES THAT CAN DISTURB MARRIED LIFE
Published On
Summary
  • चाणक्यनीतीनुसार वैवाहिक जीवनातील महत्त्वाचे नियम

  • विवाहित महिलांनी कोणत्या लोकांपासून सावध राहावे

  • कौटुंबिक सलोखा टिकवण्यासाठी चाणक्यांचे विचार

'नीतिशास्त्रा'मध्ये चाणक्या यांनी अशा चार प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन केलंय. ज्यापासून विवाहित महिलेनं दूर राहिलं पाहिजे. नाहीतर कौटुंबिक वाद होऊ शकतात. पती-पत्नींमधील वाद खूप सामान्य आहेत. मात्र, अनेक पुरुषांची अशी तक्रार असते की, त्यांच्या पत्नी अवास्तव मागण्या करतात, ज्यामुळे सतत वाद होत असतात.

CHANAKYA NITI: 4 TYPES OF INFLUENCES THAT CAN DISTURB MARRIED LIFE
IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये सुखी आणि शांत गृहजीवनासाठी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. कोणत्याही समस्येचे मूळ कारण नेहमी केवळ पती-पत्नीच असतात असे नसते. घरातील अनावश्यक वाद टाळण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी पुरुषांना काही सुचना केल्या आहेत. पुरुषांनी आपल्या पत्नींला काही विशिष्ट मित्र-मैत्रिणींपासून दूर ठेवलं पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी पत्नीला कोणापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला होता, ते आपण जाणून घेऊया.

चारित्र्यहिन स्त्री

आचार्य चाणक्य आपल्या चाणक्य नितीमध्ये पतीने आपल्या पत्नीला वाईट सवयी किंवा संशयास्पद चारित्र्य असलेल्या स्त्रियांपासून दूर ठेवावे. अशा स्त्रिया कौटुंबिक मूल्यांचा आदर करत नाहीत. त्यांच्याशी संगती केल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या केवळ स्वतःच्याच घराचा नाश करत नाहीत, तर तुमच्याही घरात वादाचे बीजे पेरतात.

CHANAKYA NITI: 4 TYPES OF INFLUENCES THAT CAN DISTURB MARRIED LIFE
डोक्याला सतत खाज का सुटते? टाळूची खाज कशी घालवायची?

पैसाचा अंहकार करणारे

ज्या स्त्रिया आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करतात, अशा स्त्रियांपासूनही दूर राहिले पाहिजे. त्यांना पैशाचे प्रदर्शन करायला आणि इतरांना कमी लेखायला आवडत असतं. त्यांच्याशी मैत्री केल्याने तुमच्या पत्नीच्या मनात अयोग्य इच्छा निर्माण होऊ शकतात, यामुळे तुमची मनःशांती नक्कीच भंग पावेल. ते कदाचित त्यांच्या संपत्तीचे प्रदर्शन करतील. परंतु तुमच्याकडे तशी आर्थिक क्षमता नसल्यास, या गोष्टी कालांतराने वादाचे कारण बनू शकतात.

CHANAKYA NITI: 4 TYPES OF INFLUENCES THAT CAN DISTURB MARRIED LIFE
Fenugreek Seeds: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे खा; ५ समस्यांपासून मिळेल आराम

संताप करणारी स्त्री

चाणक्यांनी सतत रागावणाऱ्या स्त्रियांपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. अशा स्त्रिया क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे उकरून काढतात. त्यांच्या या अप्रिय स्वभावाचा प्रभाव तुमच्या पत्नीवर पडू शकतो, ज्यामुळे तुमच्या घरातील सुख-शांती नष्ट होऊ शकते. अशा व्यक्तींना घरात किंवा समाजात मान मिळत नाही, तरीही त्या तुमच्या घरगुती जीवनावर गंभीर परिणाम करू शकतात.

द्वेष करणारे

चाणक्य यांनी मत्सर करणाऱ्या मित्रांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा व्यक्तींना तुमचे सुख किंवा यश पाहवत नाही; त्या तुमच्यासमोर गोड वागतात, पण तुमच्या पाठीमागे तुमच्याविरुद्ध कारस्थान करतात. जर तुमची पत्नी त्यांच्याशी खूप जवळची असेल, तर तुमच्या खासगी गोष्टी सार्वजनिक होऊ शकतात. त्या माहितीचा वापर करून ते तुमचे नुकसान करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com