Bharat Jadhav
टाळूची खाज कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.
टाळूवर साचलेली घाण काढून टाकण्यासाठी आणि टाळूची खाज कमी करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळायची आहेत. पाणी थंड झाल्यावर त्या पाण्याने केस धुवावेत. कडुनिंबाच्या पाण्याने केस धुतल्यास खाजेपासून आराम मिळतो.
खोबरेल तेल आणि कढीपत्ताही डोक्याची खाज कमी करू शकते. तेलात कढीपत्ता टाका आणि ते एकत्र गरम करा. तेल कोमट असतानाच ते टाळूला लावा. अर्धा ते एक तास तसेच राहू द्या आणि त्यानंतर केस धुवा. यामुळे टाळूची खाज कमी होण्यास मदत होईल.
कोंड्यामुळे डोक्याच्या त्वचेला खाज सुटत असेल तर दही आणि लिंबाच्या रसाचे मिश्रणही गुणकारी ठरू शकते. दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण टाळूवर लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर केस धुवा. यामुळे कोंडा कमी होण्यास आणि टाळूची खाज कमी होण्यास मदत होईल.
टाळूवर कोरफडीचा ताजा गर किंवा जेल लावल्यास ते टाळूला ओलावा देते. ज्यामुळे कोरडेपणा कमी होतो. तसेच यामुळे सुखद अनुभव मिळतो.
टाळू खाजण्यामागे कोंडा हे एक कारण असू शकते. कोंड्यामुळे टाळूवर खाज सुटते. टाळू कोरडी पडल्यामुळेही खाज सुटू शकते
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा गरम पाण्याने केस धुतल्यामुळे असे होऊ शकते. डोक्यातील उवांमुळे खाज सुटू शकते. विशेषतः मुलांमध्ये, उवा किंवा त्यांच्या अंड्यांमुळे (लिखांमुळे) डोक्याच्या त्वचेवर खाज सुटते.
बुरशीजन्य संसर्गामुळे टाळूवर खाज सुटते आणि त्यासोबत लाल चट्टेही पडू शकतात.टाळूवर घाम आणि घाण साचल्यामुळेही खाज सुटते.