Bharat Jadhav
डॉ. निहिता नुसार, IVF ही प्रजननक्षमतेशी संबंधित एक वैद्यकीय पद्धत आहे. यात गर्भ तयार करण्यासाठी स्त्रीची अंडपेशी आणि पुरुषाचे शुक्रजंतू शरीराबाहेर प्रयोगशाळेत एकत्र केले जातात.
त्यानंतर, गर्भधारणा साध्य करण्यासाठी तो गर्भ महिलेच्या गर्भाशयात हस्तांतरित केला जातो. याला सामान्यतः 'टेस्ट-ट्यूब बेबी' असे म्हटले जाते. पण यात प्रत्यक्षात कोणत्याही टेस्ट-ट्यूबचा वापर केला जात नाही. पण केवळ फलनाची प्रक्रिया शरीराबाहेर प्रयोगशाळेत पार पडते.
जेव्हा सामान्य औषधे किंवा इतर उपचारांद्वारे गर्भधारणेची शक्यता कमी असते, किंवा जेव्हा आधीचे उपचार अयशस्वी ठरले असतात, तेव्हाच याचा उपचार करण्यास सांगितलं जातं.
फॅलोपियन ट्यूब, पुरुषांमधील गंभीर स्पर्म समस्या, वाढलेले महिलेचं वय, अंडाशयातील भ्रूणांची कमी झालेली संख्या, तीव्र एंडोमेट्रिओसिस, काही अनुवांशिक विकार.
प्रजननक्षमता ही एक सामायिक जबाबदारी असून दोन्ही जोडीदारांनी तपासणी करून घेतली पाहिजे. महिलांमध्ये अंडाशयातील अंड्यांची संख्या, अंडोत्सर्जन आणि गर्भाशय व फॅलोपियन ट्यूब्सची स्थिती तपासली जाते.
पुरुषांसाठी सर्वात महत्त्वाची प्राथमिक चाचणी म्हणजे 'सीमेन ॲनालिसिस' असते. यातून शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि गुणवत्ता समजते. जर केवळ एकाच जोडीदाराची तपासणी केली गेली, तर या स्थितीचे नेमके कारण समोर येत नाही.
प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे त्यानुसारच चाचण्या ठरवल्या जातात. तरीही जवळपास प्रत्येक जोडप्यासाठी काही मूलभूत चाचण्या आवश्यक असतात.
एएमएच (अँटी-म्युलरियन हार्मोन), जे अंडाशयातील अंड्यांची संख्या दर्शवते. ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड आणि एएफसी (अँट्रल फॉलिकल काउंट). हार्मोन प्रोफाइल, ज्यामध्ये टीएसएच, प्रोलॅक्टिन आणि इतर आवश्यक चाचण्यांचा समावेश आहे. आवश्यक असल्यास, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबची तपासणी.
शुक्राणू कार्यक्षमता किंवा डीएनए फ्रॅगमेंटेशन चाचणी, आवश्यक असल्यास संसर्गासाठी चाचण्या, शुक्राणूंची कार्यक्षमता किंवा डीएनए फ्रॅगमेंटेशन तपासणी.
सुरुवातीच्या प्रजनन क्षमता चाचण्यांचा खर्च १०,००० ते २५,००० रुपयांच्या दरम्यान असतो. जर जनुकीय (genetic ) चाचणी प्रगत शुक्रपेशी (Advanced Sperm analysis) विश्लेषण किंवा हिस्टेरोस्कोपी यांसारख्या विशेष चाचण्यांची आवश्यकता भासली, तर हा खर्च वाढू शकतो.
भारतात एका IVF उपचाराच खर्च सरासरी १.५ लाख ते २ लाख रुपयांच्या दरम्यान असतो. यामध्ये औषधे आणि प्रोजेस्टेरॉनच्या इंजेक्शनचा खर्च समाविष्ट नाहीये.