Cervical Cancer Screening: लक्षणं न दिसता शरीरात वाढत राहतो सर्व्हायकल कॅन्सर; ही एक छोटी टेस्ट वाचवेल तुमचा जीव

At What Age To Start Cervical Cancer Screening: सर्व्हायकल कॅन्सरपासून बचावासाठी पॅप स्मीअर टेस्ट महत्त्वाची असते. एचपीव्ही इन्फेक्शन, स्क्रीनिंग पद्धती याची माहिती घेऊया
Cervical Cancer Screening
Cervical Cancer Screeningsaam tv
Published On

भारतातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येतं. ब्रेस्ट कॅन्सरनंतर महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून येणारा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर याची तपासणी आणि निदान योग्य वेळी केलं तर यापासून जीव वाचवता येतो.

TOI ला डॉ. सहाना के. पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हायकल कॅन्सर हा अशा काही कॅन्सरपैकी एक आहे ज्यासाठी प्रभावी, परवडणारी आणि उत्तम स्क्रीनिंग चाचणी उपलब्ध आहे.

चाचणी करणं महत्त्वाचं

सुमारे ७० ते ८० टक्के प्रकरणांचं मूळ हे हाय रिस्क एचपीव्ही म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस संसर्ग असतो. हा संसर्ग तुमच्या शरीरात कोणतीही लक्षणं न दाखवता राहू शकतो. परंतु नंतर तो प्री-कॅन्सर किंवा कॅन्सरमध्ये विकसित होतो. अशावेळी एचपीव्ही प्रतिबंध आणि वेळेवर चाचणी करणं महत्त्वाचं ठरतं.

Cervical Cancer Screening
Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

पॅप स्मीअर ज्याला सामान्यतः पॅप टेस्ट म्हणतात. ही टेस्ट १९४० च्या दशकात विकसित करण्यात आली होती. यामध्ये गर्भाशयाच्या मुखातून पेशींची तपासणी केली जाते. यामध्ये काही असामान्य बदल असतील तर ते लगेच लक्षात येतात. लवकर निदान केल्याने उपचार सोपे होतात.

किती पद्धतीच्या असतात टेस्ट?

पॅप टेस्ट या दोन प्रकारे केल्या जातात. पहिली पारंपारिक पद्धत असून ज्यामध्ये सर्विक्सच्या पेशी गोळा केल्या जातात आणि स्लाईडवर ठेवल्या जातात. दुसऱ्या पद्धतीत लिक्विड बेस्ड सायटोलॉजी ज्यामध्ये एका विशेष ब्रशने पेशी गोळा केल्या जातात. त्यांना प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी केली जाते. ही पद्धत अधिक प्रगत मानली जाते.

Cervical Cancer Screening
Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

का केली पाहिजे ही टेस्ट?

अनेक महिला ही टेस्ट करून घेत नाहीत. कारण त्यांना लक्षणं दिसत नसल्याने त्यांना याची गरज वाटत नाही. साधारणपणे २१ व्या वर्षापासून किंवा लैंगिकदृष्ट्या एक्टिव्ह झाल्यानंतर पॅप टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी दर तीन वर्षांनी पॅप टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात येतो.

Cervical Cancer Screening
Mini Stroke: छोट्या वाटणाऱ्या तक्रारी ठरू शकतात स्ट्रोकची सुरुवात, 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com