Face Packs : कच्च्या दुधापासून घरीच बनवा रामबाण फेसपॅक; चेहरा दिव्यासारखा उजळेल

Beauty Tips : कच्च्या दुधापासून तुम्ही ३ वेगवेगळ्या पद्धतीने फेसपॅक बनवू शकता. दुधापासून तयार केलेले हे फेस पॅक तुम्हाला स्किनवरील तेज आणखी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील.
Beauty Tips
Face Packs Saam TV
Published On

चेहरा सुंदर आणि ग्लोईंग असावा यासाठी तरुण मुली विविध प्रोडक्ट वापरतात. अशात अनेक मुलींनी अलिकडेच कॉस्मेटीक्स वापरणं बंद केलं असून नॅचरल प्रोडक्ट वापरण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने आपल्या स्किनला सौंदर्यासह पोषक तत्व सुद्धा मिळतात. त्यामुळे आज आपण कच्च्या दुधापासून तयार होणारे काही फेसपॅक पाहणार आहोत. या फेसपॅकचा वापर करून तुमची त्वचा आधीपेक्षा आता जास्त उजळेल.

ओट्स आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक

कच्च्या दुधापासून फेसपॅक बनवताना तुम्ही सर्वात आधी दूध फ्रिजमध्ये असेल तर ते नॉर्मल वातावरणात ठेवा. त्यानंतर ओट्सची पावडर करून घ्या. २ चमचे पावडर असेल तर त्यासाठी फक्त १ चमचा दुधाची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने तुम्ही मस्त फेसपॅक बनवू शकता. हा फेसपॅक वापरल्याने तुमची स्किन आधीपेक्षा जास्त उजळेल. त्यासाठी फेसपॅक चेहऱ्यावर किमान १० मिनिटे तरी तसेच असूद्या.

Beauty Tips
Bridal Beauty Tips : लग्नाच्या किती दिवस आधी फेशिअल करायचं? जाणून घ्या ब्रायडल ब्युटी टिप्स

काकडी आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच यात विविध प्रकारचे व्हिटॅमीन आणि मिनरल्स सुद्धा असतात. त्यामुळे काकडीचा रस करून घ्या किंवा काकडी बारीक किसून घ्या. किसलेल्या काकडीमध्ये दूध मिक्स करा. दूध मिक्स केल्यावर हा फेसपॅक तुम्ही किमान २० मिनिटे तरी चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने तुमची स्किन आणखी चमकदार बनेल.

पपयी आणि दूध

पपयी आणि दूधाचे मिश्रण सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी गुणकारी आहे. २ चमचे पपयीचा गर आणि २ चमचे दूध एकत्र करून तुम्ही यापासून सुद्धा रामबाण फेसपॅक बनवू शकता.

चंदन आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक

चंदन आणि कच्च्या दुधाचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी चंदन पावडर ध्या किंवा चंदन थोडं उगळून घ्या. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार दूध मिक्स करा. तयार पेस्ट फक्त १० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवल्यास तुम्हाला स्किनवर त्याचा ग्लो दिसून येईल.

Beauty Tips
Beauty Tip: चेहऱ्यावर ग्लो हवाय? तो ही मेकअप न करता, मग या 3 टीप्स फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com