Lakshmi Pujan 2023 : दिवाळीच्या दिवशी चुकूनही देवी लक्ष्मीला अर्पण करु नका ही फुले, खिशात पैसाच राहणार नाही
Avoid These Flower Lakshmi Pujan :
दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून सर्वत्र रोशनाईचे वातावरण दिसत आहे. दिवाळी, दीपावली, दिव्यांचा सण, रांगोळीचा रंग, आकाशकंदील अशा अनेक नावांनी दिवाळीला ओळखले जाते.
दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा दिवस लक्ष्मी पूजन. या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. तिचा आशिर्वाद आपल्यावर सदैव राहावा अशी प्रार्थना केली जाते. आनंदाचा उधळण करणारा मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा लक्ष्मीपूजन हे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरे केले जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
१२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असून या दिवशी गणपती (Ganpati) आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेमध्ये काही फुलांचा (Flower) वापर करु नये. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही चुका केल्यास देवी लक्ष्मी नाराज होते. तसेच धनहानीला देखील सामोरे जावे लागते.
लक्ष्मीपूजनात कणेरच्या फुलांचा कधीही वापर करु नये असे शास्त्रात म्हटले आहे. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते.
दिवाळीच्या पूजेत धोतऱ्याची फुले कधीही वापरु नयेत. या फुलांच्या वापरामुळे घरात पैशांची कमतरता भासू शकते.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रुईची फुले अर्पण करु नये. हे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहात नाही.
देवी लक्ष्मीला कमळ किंवा सूर्यफुलाचे फूल पुजेच्या दिवशी अर्पण केल्यास प्रसन्न होऊन आशिर्वाद देते. तसेच घरात (Home) सुख समृद्धी नांदते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

