दिवाळी म्हटंल की, आपल्याला सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात रांगोळीचे रंग, आतेषबाजी, कंदील आणि फराळाच्या गोडव्याची चव चाखायला मिळते.
हिंदू पंचागानुसार दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा ही चतुर्दशी १२ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, काली माता आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हा सण (Festival) साजरा केला जातो. यंदा नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त कधी आहे? तिथी आणि पूजा मुहूर्त कधी? जाणून घ्या
1. नरक चतुर्दशी कधी आहे?
नरक चतुर्दशी ही १२ नोव्हेंबरला रविवारी साजरी केली जाणार आहे. यंदा नरक चतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीपूजनचा मुहूर्त देखील आहे. हे दोन्ही दिवस एकाच दिवशी आले आहेत.
2. नरक चतुर्दशी तिथी आणि शुभ मुहूर्त
नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त हा ११ नोव्हेंबरला शनिवारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी सुरु होईल तर समाप्ती १२ नोव्हेंबरला दुपारी ०२ वाजून ४४ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार या दिवस १२ नोव्हेंबरला साजरा (Celebrate) केला जाईल.
नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत आहे. या काळात तुम्ही पूजा करु शकता.
3. नरक चतुर्दशी पूजा विधी
नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज, काली माता, भगवान शिव, हनुमान यांची आराधना केली जाते.
भगवान विष्णूंची खास पूजा केली जाते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.