Do Not Reheat : तुम्ही वारंवार पदार्थ गरम करताय? जाणून घ्या दुष्पपरिणाम

Do not reheat these food items : अनेकांना गरम अन्न खायला आवडते. मात्र, दुसऱ्यांदा गरम केलेलं अन्न खाणे आरोग्यास हानिकारक ठरते. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Monsoon Vegetable
Monsoon VegetableYandex
Published On

मुंबई : तुम्ही पाहिलं असेल की घरात एखादा पदार्थ शिल्लक असेल, तर अनेक जण गरम करून ठेवतात. अनेकांना उरलेलं अन्न गरम करून खाण्याची सवय असते. मात्र, वारंवार अन्न गरम करून खाणे चांगले नसते. दुसऱ्यांदा अन्न गरम करून खाणे आरोग्यास हानिकारक असते. विशेष म्हणजे ३ पदार्थ चुकूनही गरम करुन खाऊ नये. याविषयी न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी माहिती दिली आहे.

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांच्या म्हणण्यानुसार, चाय, पालक, स्वयंपाकासाठीचे तेल गरम करु नये. हे तीन पदार्थ करून खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

चहा

चहा एकदा तयार केल्यानंतर प्यायला हवा. दुसऱ्यांदा गरम केलेला चहा पिणे टाळला पाहिजे. यामुळे पित्ताचा त्रास होतो. चाय प्यायल्याने झोपेच्या समस्येशी सामना करावा लागतो. चहामध्ये टॅनिनचं अधिक प्रमाणात असतं, त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते.

Monsoon Vegetable
Neem Leaf For Health: त्वचेवर कडूलिंबाची पानं वापरल्यास फंगल इंफेक्शन होतील दूर; जाणून घ्या फायदे...

कुकींग ऑईल

भारतीय घरामध्ये घरात पुऱ्या तयार केल्यानंतर उरलेलं तेल दुसऱ्या भाजीसाठी वापरतात. मात्र, एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरणे शरीराला नुकसादायक ठरतं. या तेलाचा वापर पुन्हा जेवणासाठी केल्याने व्यक्ती हृदय विकारापासून कर्करोगाच्या आजाराला बळी पडतो.

Monsoon Vegetable
Health Tips: उन्हाळ्यात काजू बदाम खाणे योग्य की अयोग्य

पालक

पालक दुसऱ्यांदा गरम केल्याने त्यात लिस्टेरिया मोनो सायटोजेन्स नावाचा बॅक्टेरिया निर्माण होतो. यामुळे ही भाजी विषारी होते. पालकच्या भाजीमध्ये नायट्रेट, लोह असतं. पालकच्या भाजीला पुन्हा गरम केल्यास आरोग्याचं नुकसान होतं. फक्त पालकच नाही, कोणत्याही प्रकारची पालेभाजीला दुसऱ्यांदा गरम करणे आरोग्यासाठी हानीकारक असते. या व्यतिरिक्त बटाटा, अंडी आणि शिळा भाताला गरम करून खाणे टाळले पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com