Mayonnaise : घातक मेयोनीजला करा बायबाय; त्या ऐवजी वापरा 'हे' पदार्थ, आरोग्यही राहिल निरोगी

Alternative Sauce For Mayonnaise : मेयोनीज विविध पदार्थांसह खाण्याचा सध्या एक अनोखा ट्रेन्ड सुरू आहे. मात्र मेयोनीज जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावार त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे आज मेयोनीजला ऑप्शन असलेले पदार्थ जाणून घेऊ.
Mayonnaise
Alternative Sauce For MayonnaiseSaam TV

सँडवीच, कुरकुरे, वेफर, पिझ्झा आणि बरगर अशा सर्वच पदार्थांमध्ये मेयोनीज टाकलं जातं. स्ट्रिट फूडमधील मोमोज किंवा फ्रँकी देखील मेयोनीज शिवाय खावीशी वाटत नाही. मेयोनीज विविध पदार्थांसह खाण्याचा सध्या एक अनोखा ट्रेन्ड सुरू आहे. मात्र मेयोनीज जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावार त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे आज मेयोनीजला ऑप्शन असलेले पदार्थ जाणून घेऊ.

Mayonnaise
High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

एवोकाडो मेयोनीज

आयरन, मैग्नेशियम, कैल्शिअम, पोटेशिअम आणि जिंक असे सर्वच जिवनसत्व एवोकाडोमध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती याचे सेवन करतो. मात्र काही लोकांनाच एवोकाडोपासून मेयोनीज बनवलं जातं या बद्दल माहिती आहे. त्यासाठी एवोकाडोचा गर काढून घ्या. त्यात लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल आणि मिठ टाकून मिक्स करून घ्या. हे एवोकाडो मेयोनीज तुम्ही पास्ता आणि पिझ्झा,बर्गरसोबत सुद्धा खाऊ शकता.

पॅपरिका मेयोनीज

पॅपरिका मेयोनीज बनवणे देखील जास्त कठीण नाही. त्यासाठी एक शिमला मिर्ची घ्या. शिमला मिर्चीमध्ये लसून, पनीर, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबू पिळून घ्या. त्यानंतर या सर्व गोष्टी मिक्सरला छान ब्लेंड करून घ्या. तयार स्मुथ बॅटर तुम्ही ब्रेड, टोस्ट आणि फ्रँकीसोबत देखील खाऊ शकता.

काजू मेयोनीज

काजूमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं हे तर आपल्या सर्वांना महितीच आहे. त्यामुळे तुम्ही काजूपासून देखील मेयोनीज बनवू शकता. काजू मेयोनीज बनवण्यासाठी आधी काजू रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर यामध्ये पनीर, लसूण, काळीमिरी, मिरची यासर्व गोष्टी अॅड करा. हे मेयोनीज तुम्ही ५ ते ६ दिवस फ्रिजमध्ये सुद्धा स्टोकर करून ठेवू शकता.

मेयोनीज अंड्यापासून किंवा मग तेलापासून बनवलं जातं. त्यामुळे आरोग्यावर याचे घातक परिणाम होतात. आहारात जास्त प्रमाणात मेयोनीज असल्यास त्याने हृदयविकाराचा झटका, हाय ब्लड प्रेशर यासह लठ्ठपणाच्या समस्या जाणवतात. त्यामुळे मेयोनीज ऐवजी तुम्हीही हे पदार्थ वापरू शकता.

Mayonnaise
Food for Kids: आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास तुमच्या मुलांचं आरोग्य राहील निरोगी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com