Daily Tea Intake: तुमच्या वयानुसार दिवसात किती चहा प्यावा? डॉक्टरांनी सांगितलं योग्य प्रमाण, जाणून घ्या

How Much Tea Should Different Age Groups Drink: दिवसातून किती चहा पिणे आरोग्यासाठी योग्य आहे? ग्रीन टीचे फायदे, जास्त चहा पिण्याचे दुष्परिणाम, कॅफीनचे प्रमाण आणि चहा पिण्याची योग्य वेळ याबाबत तज्ज्ञांनी दिलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
How Much Tea Should Different Age Groups Drink
How Much Tea Should Different Age Groups Drinksaam tv
Published On

आपल्या देशात अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने सुरु होते. काहींना बेड टी आवडते तर काही जण दिवसातून बरेचवेळा चहाचा आनंद घेतात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, तुम्ही वयोमानानुसार किती चहा प्यायला पाहिजे. कारण गरजेपेक्षा जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो.

हेल्दी चहाचा पर्याय निवडा

healthline या वेबसाईटनुसार, चहामधील कॅफीन आणि इतर कंपाउंड्स ऊर्जा देऊ शकतात, परंतु विशेषतः अतिसेवन केल्यास ते हानिकारक देखील ठरू शकतात. कॅटेचिन्स नावाच्या अँटीऑक्सिडंट्सच्या मुबलक प्रमाणामुळे अलिकडच्या वर्षांत ग्रीन टी एक हेल्दी ड्रिंक म्हणून लोकप्रिय झालंय. संशोधनातून असं दिसून आलंय की, हे कंपाउंड्स हृदयरोग, टाईप २ मधुमेह आणि काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

यापूर्वी केलेल्या काही अभ्यासांनुसार, ग्रीन टी चयापचय क्रिया सुधारण्यास आणि फॅट बर्न करण्यास देखील मदत करू शकतं. संशोधनात असंही आढळून आलंय की, जे लोक नियमितपणे ग्रीन टी पितात त्यांचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय त्यांचं एकूण आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

How Much Tea Should Different Age Groups Drink
Liver failure symptoms: शरीरात रात्रीच्या वेळी ही 3 लक्षणं दिसली तर समजा तुमचं लिव्हर होतंय निकामी

एका दिवसात किती चहा प्यायला पाहिजे?

आता सर्वांसमोर असलेला प्रश्न म्हणजे, किती प्रमाणात चहा पिणं योग्य आहे? तज्ञांच्या मते, हे वय, आरोग्य स्थिती आणि जीवनशैलीवर अवलंबून असतं. साधारणपणे, किशोरवयीन आणि तरुण प्रौढांनी दिवसातून १ ते २ कपांपेक्षा जास्त कॅफीनयुक्त चहा पिऊ नये. निरोगी प्रौढांसाठी ३ ते ५ कप ग्रीन टी फायदेशीर मानला जातो. अनेक अभ्यासांमधून आरोग्याच्या फायद्यांसाठी हे प्रमाण सर्वोत्तम असल्याचं दिसून आलंय.

डॉक्टरांनी इशारा दिलाय की, जास्त प्रमाणात चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन केल्याने अस्वस्थता, निद्रानाश, डोकेदुखी, पोटदुखी आणि चिंता यांसारख्या समस्या वाढू शकतात. गर्भवती महिलांना विशेषतः त्यांच्या कॅफीनच्या सेवनाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. दररोज ३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफीनचं सेवन करण्याची शिफारस केली जात नाही.

How Much Tea Should Different Age Groups Drink
Morning Body Pain: रोज सकाळी शरीर दुखतंय? हलक्यात घेऊ नका; 'या' गंभीर आजारांची असू शकतात लक्षणं

कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी?

आरोग्य तज्ज्ञ असेही सांगतात की चहा पिण्याची वेळ महत्त्वाची असते. रिकाम्या पोटी जास्त चहा प्यायल्याने पित्त आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीरातील आयर्नचं शोषण कमी होऊ शकतं. चहा पूर्णपणे सोडण्याची गरज नाही परंतु त्याचं प्रमाण आणि वेळ याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.

How Much Tea Should Different Age Groups Drink
Fatty Liver Disease: देशातील 38% लोक फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त, शरीरात दिसणारी ही 5 लक्षणं ओळखा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com