Morning Body Pain: रोज सकाळी शरीर दुखतंय? हलक्यात घेऊ नका; 'या' गंभीर आजारांची असू शकतात लक्षणं

Why Does My Body Ache After Waking Up: सकाळी उठल्यानंतर मान, पाठ किंवा शरीर दुखत असेल तर त्यामागे खराब झोप, चुकीची उशी, व्हिटॅमिन डीची कमतरता किंवा इतर आरोग्य समस्या कारणीभूत असू शकतात. तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे आणि उपाय जाणून घ्या.
Why Does My Body Ache After Waking
Why Does My Body Ache After Waking saam tv
Published On

आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की, दिवसाची सुरुवात चांगली आणि फ्रेश व्हावी. मात्र काहींची सुरुवात ही अंगदुखीने होते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर मान आखडल्यासारखी वाटणं, कंबरेत ताण जाणवणं किंवा खांदे जड झाल्यासारखं वाटणं ही समस्या अनेकांना भेडसावते. बहुतेक जण याला वाढतं वय, जुनी गादी किंवा दिवसभराचा थकवा ही कारणं असल्याचं मानतात. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात.

सकाळी शरीर का दुखू लागतं?

झोप ही केवळ विश्रांतीसाठी नसून शरीराच्या दुरुस्तीची महत्त्वाची प्रक्रिया या काळात सुरू असते. स्नायूचं कार्य, रक्ताभिसरण सुधारण्याचं काम त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित अनेक प्रक्रिया रात्रीच्या झोपेदरम्यान पूर्ण होतात. या प्रक्रियांमध्ये कोणताही अडथळा निर्माण झाल्यास सकाळी उठल्यानंतर शरीरात वेदना, थकवा किंवा जडपणा जाणवू शकतो.

Why Does My Body Ache After Waking
Kidney Damage Symptom: शरीरात दिसणारी ही 6 लक्षणं सांगतात तुमची किडनी निकामी होतेय

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आपण झोपेत असताना भले आपलं शरीर झोपेत शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असले तरी शरीरातील पेशी पूर्णपणे निष्क्रिय होत नाहीत. अनेक तास एकाच स्थितीत झोपल्यामुळे स्नायू आणि सांध्यांची हालचाल कमी होते. त्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये ताठरपणा जाणवू लागतो. याच कारणामुळे सकाळी उठल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत चालताना किंवा हालचाल करताना वेदना जाणवू शकतात.

उशी आणि गादी किती महत्त्वाची?

झोपताना तुम्ही वापरत असलेली चुकीची उशी किंवा शरीराला योग्य आधार न देणारी गादीदेखील या समस्येला कारणीभूत ठरू शकते. उशी खूप उंच असल्यास मानेच्या स्नायूंवर रात्रभर ताण राहतो. त्याचप्रमाणे पाठीच्या कण्याला योग्य आधार न मिळाल्यास कंबरदुखी आणि खांदेदुखीचा त्रास वाढू शकतो.

स्लिप क्वालिटीचा परिणाम

झोपेची गुणवत्ता खराब असणं हे देखील सकाळच्या अंगदुखीमागील एक मोठं कारण मानलं जातं. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थशी संबंधित संशोधनानुसार, वारंवार होणारी झोपमोड तुमच्या शरीरात इन्फ्लामेशन वाढवतात. शरीरातील वेदना झोपेवर परिणाम करतात आणि खराब झोप दुसऱ्या दिवशी वेदना आणखी वाढवू शकते.

Why Does My Body Ache After Waking
Liver damage symptoms: फक्त दारू नाही तर या ५ सवयी तुमचं लिव्हर करतायत खराब

कोणत्या आजारांचे असू शकते संकेत?

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वेळी सकाळची अंगदुखी ही सामान्य बाब नसते. जर वेदना दीर्घकाळ कायम राहत असेल तर ते एखाद्या गंभीर आरोग्य समस्येचे संकेत असू शकतात. ऑस्टिओआर्थरायटिस, रुमेटॉइड आर्थरायटिस, फायब्रोमायल्जिया, व्हिटॅमिन डीची कमतरता, स्लीप अॅप्निया, सततचा ताण यांसारख्या समस्या देखील सकाळी शरीर दुखण्यामागे कारणीभूत असू शकतात.

Why Does My Body Ache After Waking
Fatty Liver Disease: देशातील 38% लोक फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त, शरीरात दिसणारी ही 5 लक्षणं ओळखा

या समस्येपासून आराम कसा मिळवावा?

आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, रोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवणं, नियमित शारीरिक हालचाल करणं, झोपण्यापूर्वी हलकं स्ट्रेचिंग करणं आणि पुरेसं पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. तसंच शांत, आरामदायी आणि चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण तयार करणंही महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com