Surabhi Jayashree Jagdish
आपल्या शरीरातील किडनीचं काम रक्तातील घाण फिल्टर करणं, शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं ही आहेत. अशातच किडनी खराब होण्याची सुरुवात अनेकदा अगदी छोट्या लक्षणांपासून होते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात
लघवीत होणारे बदल किडनीच्या समस्येचा इशारा देतात. रात्री वारंवार लघवी लागणं, लघवीचा रंग खूप गडद किंवा अगदी फिकट होणं, फेसाळ लघवी होणं, लघवीत रक्त दिसणं ही लक्षणे गंभीर मानली जातात.
तरुणांमध्ये अचानक वाढलेला रक्तदाबही किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं. किडनी रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचं काम करते. त्यामुळे किडनी खराब झाल्यास उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते.
सतत थकवा जाणवणं, अशक्तपणा, लक्ष केंद्रित न होणं ही देखील महत्त्वाची लक्षणं आहेत. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात टॉक्सिन घटक साचू लागतात आणि त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीला थकवा येऊ लागतो.
भूक कमी होणे, मळमळ, उलट्या होणं किंवा तोंडाला धातूसारखी चव येणं ही लक्षणं देखील किडनीशी संबंधित असू शकतात. शरीरात घाण साचल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो आणि अशा समस्या निर्माण होतात.
श्वास घेण्यास त्रास होणं हेही किडनी खराब होण्याशी संबंधित आहे. शरीरात पाणी साचून ते फुफ्फुसांमध्ये गेल्यास श्वास घ्यायला त्रास होतो. तसंच किडनीमुळे तयार होणाऱ्या EPO या हार्मोनची निर्मिती कमी झाल्यास लाल रक्तपेशींची संख्या घटते आणि अॅनिमियाची समस्या निर्माण होते. त्यामुळेही दम लागू शकतो.
शरीरात खाज येणं, त्वचा कोरडी पडणं किंवा त्वचेच्या रंगात बदल होणं ही लक्षणंही किडनीशी संबंधित असू शकतात. शरीरातील खनिजांचं संतुलन बिघडल्यामुळे अशा समस्या दिसून येतात.