Liver damage symptoms: फक्त दारू नाही तर या ५ सवयी तुमचं लिव्हर करतायत खराब

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर

दारू यकृतासाठी हानिकारक असते हे सर्वांनाच माहितीये. पण काही रोजच्या सवयी आणि पदार्थ देखील लिव्हरचे गंभीर नुकसान करू शकतात. अनेक लोक नकळत अशा गोष्टींचं सेवन करतात ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिससारखे आजार होऊ शकतात.

Paracetamol liver damage

धोकादायक सवयी

विशेष म्हणजे या गोष्टी सुरुवातीला शरीरात कोणतीही मोठी लक्षणं दाखवत नाहीत. या गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुमच्या लिव्हरसाठी धोकादायक आहेत त्या पाहूयात.

Hepatitis B infection

जास्त प्रमाणात पेनकिलर घेणं

पॅरासिटामॉलसारखी औषधं जास्त प्रमाणात घेतल्यास लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे थकवा, उलट्या अशी लक्षणं दिसू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सतत औषधं घेणं टाळणं आवश्यक आहे.

Liver disease prevention

जास्त साखर

सॉफ्ट ड्रिंक्स, केक, कँडी आणि पॅकेज्ड ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. या पदार्थांमुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वाढू शकतो. सतत अशा पदार्थांचे सेवन केल्यास लिव्हरमध्ये चरबी साचू लागते.

Soft drinks health risks

प्रोसेस्ड आणि जंक फूड

बाहेरचे तळलेले आणि प्रोसेस्ड पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणात असतात. हे पदार्थ लिव्हरमध्ये सूज निर्माण करू शकतात. सतत जंक फूड खाल्ल्याने वजन वाढून फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते.

Liver care tips

चुकीचे सप्लिमेंट्स

अनेक बॉडीबिल्डिंग सप्लिमेंट्समध्ये लिव्हरला हानी पोहोचवणारे घटक असू शकतात. विशेषतः स्टेरॉईड्सयुक्त सप्लिमेंट्स शरीरासाठी गंभीर नुकसानकारक ठरू शकतात. कोणतेही सप्लिमेंट घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Sugar and liver health

हिपॅटायटिस B आणि C इन्फेक्शन

हे इन्फेक्शन संसर्ग वेळेवर उपचार न घेतल्यास लिव्हरचे कायमस्वरूपी नुकसान करू शकतात. सुरुवातीला लक्षणं कमी दिसत असल्यामुळे अनेकजण या आजाराकडे दुर्लक्ष करतात. लसीकरण आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

Sugar and liver health

Lemon water: लिंबू पाणी प्यायल्याने एसिडीटी वाढते की कमी होते?

acidity problem
येथे क्लिक करा