Lemon water: लिंबू पाणी प्यायल्याने एसिडीटी वाढते की कमी होते?

Surabhi Jayashree Jagdish

लिंबू पाणी

तुम्हीही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात लिंबू पिळून पीत असाल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत अनेक फायदे सांगितले जातात.

acidity problem

अॅसिडिटीचा त्रास

परंतु तुम्ही किती विचार केलाय का, अॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे खरंच फायदेशीर आहे का. तज्ज्ञांच्या मते, लिंबूपाणी काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं तर काहींसाठी ते त्रास वाढवणारंही ठरू शकतं.

acid reflux

लिंबूपाणी शरीरात नेमकं काय करतं?

लिंबाचा रस चवीला आंबट आणि आम्लयुक्त असला तरी शरीरात पचन झाल्यानंतर त्याचे काही घटक अल्कलाइन स्वरूपात काम करतात. त्यामुळे पोटातील अतिरिक्त आम्ल कमी करण्यास मदत होऊ शकते.

digestion health

पित्त तयार होणं

लिंबूपाणी प्यायल्याने यकृतातून अधिक प्रमाणात पित्त तयार होते. हे पित्त अन्न पचवण्याची प्रक्रिया सुधारतं आणि जेवणानंतर होणारी गॅस, जळजळ किंवा अॅसिडिटी कमी करण्यास मदत करू शकतं.

lemon water benefits

कोणी काळजी घ्यावी?

प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते. ज्यांना आधीपासून तीव्र अॅसिडिटी, पोटात अल्सर किंवा वारंवार छातीत जळजळ होण्याचा त्रास आहे, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच ज्यांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांच्यासाठी लिंबातील सिट्रिक अॅसिड त्रासदायक ठरू शकते.

warm water and lemon

लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

अॅसिडिटी कमी करण्यासाठी लिंबूपाणी प्यायचं असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा. एका ग्लास कोमट किंवा साध्या पाण्यात अर्धे लिंबू किंवा एक छोटा चमचा लिंबाचा रस पुरेसा असतो. लिंबाचा रस कधीही थेट पिऊ नये.

stomach acidity

साखर टाकणं टाळा

लिंबाच्या रसात साखर टाकणं टाळा. कारण त्यामुळे अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. चव वाढवण्यासाठी थोडं काळं मीठ किंवा भाजलेलं जिरे घालू शकता. हेवी जेवणानंतर सुमारे अर्ध्या तासाने लिंबूपाणी प्यायल्यास पचन सुधारण्यास मदत होऊ शकते.

digestive health

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा