Liver failure symptoms: शरीरात रात्रीच्या वेळी ही 3 लक्षणं दिसली तर समजा तुमचं लिव्हर होतंय निकामी

Surabhi Jayashree Jagdish

झोपेच्या समस्या

स्लीप डिस्टर्बन्सेस इन पेशंट्स विथ लिव्हर सिरोसिस : प्रिव्हेलन्स, इम्पॅक्ट अँड मॅनेजमेंट चॅलेंजेस या अभ्यासानुसार, लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतात.

Sleep disturbance

लिव्हर

रात्री झोप न लागणं, सतत थकवा जाणवणं, रात्री अचानक जाग येणं ही साध्या थकव्याची लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका. मात्र तज्ज्ञांच्या मते, ही लक्षणं लिव्हर निकामी होण्याची सुरुवातही असू शकतात.

Insomnia causes

लक्षणं

झोप येण्यासाठी खूप वेळ लागणं, रात्री वारंवार जाग येणं किंवा पूर्ण झोप झाल्यानंतरही शरीराला विश्रांती न मिळाल्यासारखं वाटणं अशी लक्षणं यात दिसतात. काही रुग्ण दिवसभर खूप झोप येत असल्याची तक्रारही करतात.

Night sleep problems

हेपॅटिक एन्सेफालोपॅथी

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, यामागचं एक मुख्य कारण म्हणजे ‘हेपॅटिक एन्सेफालोपॅथी’ ही स्थिती. लिव्हर नीट काम करत नसल्यामुळे शरीरातील टॉक्सिन द्रव्यं बाहेर टाकली जात नाहीत. ही विषारी द्रव्यं मेंदूपर्यंत पोहोचल्याने मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे गोंधळ उडणं, लक्ष केंद्रित न होणं, विचार करण्यात अडचणी येणं अशा समस्या निर्माण होतात.

Fatigue symptoms

निद्रानाश

लिव्हरच्या रुग्णांमध्ये निद्रानाशाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. अनेकांना रात्री झोप लागत नाही, तर काहींना झोप लागली तरी मध्येच वारंवार जाग येते. काही रुग्णांमध्ये ‘स्लीप-वेक रिव्हर्सल’ म्हणजे दिवसा झोप येणं आणि रात्री जाग येणं अशी स्थिती निर्माण होते.

Liver health

हार्मोन्समधील बदल

डॉक्टरांच्या मते, शरीरातील मेलाटोनिन या झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोनमध्ये होणारे बदलही यासाठी कारणीभूत ठरतात. निरोगी लिव्हर मेलाटोनिनचं संतुलन राखतं. पण लिव्हर खराब झाल्यास हे हार्मोन शरीरातून योग्य प्रकारे बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीराचं नैसर्गिक दिवस-रात्र चक्र बिघडतं.

Melatonin imbalance

जीवनशैलीतील बदल

काही साधे जीवनशैलीतील बदलही उपयोगी ठरू शकतात. दररोज ठराविक वेळेला झोपणं आणि उठणं, योग किंवा हलका व्यायाम करणं, झोपण्यापूर्वी ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम करणं यामुळे मन शांत राहण्यास मदत होते. काही वेळा मॉडाफिनिल किंवा हायड्रॉक्सिझिनसारखी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.

Chronic liver disease

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

येथे क्लिक करा