Ashadhi Ekadashi Rashibhavishya: आषाढी एकादशीला 12 राशींनी करा या गोष्टी, बंद नशीबाचे दरवाजे उघडतील

Ashadhi Ekadashi RashiChakra : हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते.
Ashadhi Ekadashi Horoscope
Ashadhi Ekadashi HoroscopeSaam Tv
Published On

Ashadhi Ekadashi Rashiphal : पाऊले चालती पंढरीची वाट..., आज महाराष्ट्र घरोघरी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते.

यावर्षी देवशयनी एकादशी ही २९ जून रोजी म्हणजे आज आहे. आजच्या दिवसापासून चातुर्मास सुरु होतो. असे म्हटले जाते की, आजच्या दिवशी एकादशीचे व्रत केल्यास अनेकांना फायदे होतात. देवशयनी एकादशीचे व्रत केल्याने अनेक फायदे होतात. देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते असे मानले जाते. देवशयनी एकादशीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टी केल्यास तुमच्या बंद नशीबाचे भाग्य उजळतील.

Ashadhi Ekadashi Horoscope
Vitthal Fish Earrings Importance: विठ्ठलाच्या कर्णकुंडलात मासे का असतात ?

1. मेष - देवशयनी एकादशीच्या (Ekadashi) दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी भगवान श्रीहरीला गूळ आणि हरभरा अर्पण करा. असे केल्याने सौभाग्य वाढेल.

2. वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला वैजयंतीची माळ अर्पण करावी. भगवान श्री हरी यामुळे प्रसन्न होऊन तुम्हाला अपार सुख आणि संपत्ती देतील. तसेच श्रीहरीच्या मंत्रांचा जप करा.

Ashadhi Ekadashi Horoscope
Ashadhi Ekadashi Story: आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू का जातात निद्रावस्थेत? जाणून घ्या चातुर्मासची कथा

3. मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. तसेच तुळशीला गंगाजल अर्पण करावे. यामुळे वैवाहिक (Marriage) जीवनात आनंद मिळेल.

4. कर्क - कर्क राशींनी देवशयनी एकादशीला श्री हरी विष्णूला हळदीच्या सात गुंठ्या चढवाव्यात. यासोबत ओम ह्रीं हिरण्यगर्भाय अव्यक्तरूपिने नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे सर्व कामात यश (Success) मिळेल. अडथळे दूर होतील.

5. सिंह - सिंह राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना पितांबर अर्पण करावे. धनलाभ लवकरच होईल.

6. कन्या - कन्या राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला विष्णु सहस्त्रनामाचा जप करावा. त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी होईल.

Ashadhi Ekadashi Horoscope
Ashadhi Ekadashi Importance: यावर्षी 5 महिने निद्रावस्थेत राहतील भगवान विष्णू, जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्त्व

7. तूळ - तूळ राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची आराधना करावी यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील.

8. वृश्चिक - करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला मध आणि दही अर्पण करावे.

9. धनु - धनु राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूला नारळ अर्पण करावे. नंतर हा नारळाचा प्रसाद खाऊन उपवास सोडावा. सर्व दु:ख दूर होतील.

10. मकर - मकर राशीच्या देवशयनी एकादशीला सप्तधनाचे दान करा. यामुळे सुख-समृद्धी येईल.

Ashadhi Ekadashi Horoscope
Akshaya Naik : ही सुंदरा खरचं मनामध्ये भरली...

11. कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला तुळशीमातेला लाल चुनरीने अर्पण करावे. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

12. मीन - देवशयनी एकादशीला मीन राशीच्या लोकांनी ब्राह्मणाला भोजन द्यावे आणि गोठ्यात दान करावे. आर्थिक समस्या दूर होतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com