Mesh Rashi 2024 : नवीन वर्षात खुशखबरचा पाऊस! धन-दौलत वाढण्याची शक्यता, पदोन्नतीही मिळेल

Aries Horoscope 2024 : मेष राशींवर ग्रहमानाच्या स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळेल. जाणून घेऊया कसे असेल मेष राशीसाठी नवीन वर्ष.
Mesh Rashi 2024
Mesh Rashi 2024Saam Tv
Published On

Mesh Rashibhavishya In Marathi 2024 :

अवघ्या काही दिवसांत नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार अनेकांच्या जीवनात मोठे बदल दिसून येतील. नवीन वर्षात ग्रहांची स्थिती पाहिली तर सूर्य आणि मंगळ हे भौमादित्य योग तयार करुन धनु राशीत प्रवेश करतील.

चंद्र सिंह राशीत असेल तर बुध आणि शुक्र ग्रह राशीत असतील. त्यामुळे मेष राशींवर ग्रहमानाच्या स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळेल. जाणून घेऊया कसे असेल मेष राशीसाठी नवीन वर्ष.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पैशाच्या (Money) दृष्टीकोनातून पाहिल्यास हे वर्ष चांगले असेल. व्यवसायाच्या क्षेत्रात गुंतलेल्या लोकांसाठी पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये वाढ होईल. नवीन गोष्टी करण्याच्या संधी मिळतील. तुमच्या स्वभावामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल.

Mesh Rashi 2024
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 : या ४ राशींना मिळणार बक्कळ पैसा, प्रेमींयुगलांसाठी खास असेल हा आठवडा

कुटुंबात (Family) एकता वाढेल. धन साठवण्याची स्थिती स्थिर राहिल. हे वर्ष शौर्याच्या दृष्टीकोनातून देखील चांगले वर्ष ठरु शकते. तसेच सामाजिक स्थान, प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल. भावडांमध्ये दूरावा येईल. काही प्रमाणात तणाव जाणवू शकतो. सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून वेळ खूप सकारात्मक असू शकतो.

करिअरच्या (Career) दृष्टीकोनातून हे वर्ष अनुकूल राहिल. अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. नवीन पदवीसाठी काळ अनुकूल राहील. अभ्यासात काही प्रमाणात अंतर येईल. मुलांच्या बाजूने काही प्रमाणात तणाव वाढेल. सततच्या चिंतेमुळे ताण घ्याल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत तणाव निर्माण होऊ शकतो. प्रकृती स्थिर ठेवाल, अन्यथा वैवाहिक जीवनात किंवा प्रेमसंबंधात नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जोडीदाराच्या कामात तणावाची परिस्थिती निर्माण होईल.

Mesh Rashi 2024
Vastu Tips : प्रमोशन मिळत नाहीये? बिझनेस ठप्प झालाय? या वास्तू टीप्स फॉलो करा, दिवसरात्र होईल प्रगती

यावर्षी कोणतेही काम करताना मनोबल उच्च राहिल. कामात नशीब तुमच्या बाजूने असेल. मानसिक अस्थिरता आणि विचारात वाढ होण्याची शक्यता आहे. पोटाची काळजी घ्या. इन्फेक्शन, अॅलर्जी इत्यादींचा त्रास होऊ शकतो. उपाय म्हणून या काळात वाहन चालवताना सावध राहा. भगवान शिवाची पूजा करणे किंवा रुद्राभिषेक करणे खूप फायदेशीर ठरेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com