Vastu Tips : प्रमोशन मिळत नाहीये? बिझनेस ठप्प झालाय? या वास्तू टीप्स फॉलो करा, दिवसरात्र होईल प्रगती

Vastu Tips For Home : व्यवसायाला गती न मिळण्याती अनेक कारणे आहेत. त्यातील एक वास्तुदोष. अनेकदा आपल्याकडून अशा चुका होतात ज्यामुळे कामाच्या ठिकाणी वास्तूदोष निर्माण होतो.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On

Vastu Tips For Business :

आपल्याला चांगली नोकरी मिळावी आणि त्यात चांगले प्रमोशन व्हावे असे प्रत्येकाला वाटते. तसेच अनेकांना बिझेनस करण्याची देखील इच्छा असते. लोक आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस अधिक मेहनत करतात. परंतु, कठोर परिश्रम करुन देखील त्यांना हवे तसे यश मिळत नाही.

व्यवसायाला गती न मिळण्याती अनेक कारणे आहेत. त्यातील एक वास्तुदोष. अनेकदा आपल्याकडून अशा चुका होतात ज्यामुळे कामाच्या ठिकाणी वास्तूदोष निर्माण होतो. त्यामुळे व्यक्तीला आर्थिक (Money), मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही तुमच्या बिझेनसमध्ये (Business) प्रमोशन हवे असेल तर वास्तूनुसार (Vastu Tips) या टीप्स लक्षात ठेवाच. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vastu Tips
Vastu Tips : Happy Married Life साठी बेडरुममध्ये करा हे उपाय, कधीच होणार नाही नवरा-बायकोमध्ये भांडण

वास्तूशास्त्रानुसार व्यापाराच्या ठिकाणी देखील दिशा अधिक महत्त्वाची असते. ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील दिशा ही प्रत्येक वस्तूसाठी महत्त्वाची ठरली जाते. त्यामुळे घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा समावेश होतो.

Vastu Tips
Name Astrology : S नावाचे लोक असतात अधिक आकर्षित, या गोष्टीत नेहमीच पुढे
  • वास्तूनुसार व्यवसायाला चालना देण्यासाठी उत्तर दिशेला निळ्या कमळाचे चित्र लावा.

  • आपल्या कामाची गती वाढवण्यासाठी व्यावसायिकांनी उत्तर दिशेला पांढऱ्या रंगाची पिगी बँक ठेवावी त्यात पैसेही टाकावेत.

  • व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायात गती आणण्यासाठी काळ्या मिरीचा जेवणात वापर करावा.

  • व्यवसायात प्रगती होण्यासाठी व्यापारी आपल्या आहारात किंचित आंबट पदार्थ देखील समाविष्ट करु शकतात.

  • वास्तूनुसार गुरुवारी घटस्थापनेच्या ईशान्य कोपऱ्यात केशर स्वस्तिक बनवा.

  • बेडरुममध्ये देव, गुरु , आई-वडील किंवा आपल्यापेक्षा मोठ्या कोणत्याही व्यक्तींचा फोटो लावणे चुकीचे आहे. बेडरुममध्ये कधीही मंदिर लावू नका.

  • बेडरुममध्ये कधीही पूजास्थान बनवू नका. बेडरुममध्ये शुक्राचे अधिपत्य असते. हा भौतिकवादी ग्रह आहे. यामुळे पती पत्नींमध्ये वाद निर्माण होऊ शकतो.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com