Vastu Tips: तुम्ही घरात चुकीच्या दिशेला कपडे ठेवताय का? वास्तुशास्त्रात सांगितली योग्य दिशा

Clothes Storage Vastu: वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छ आणि घाणेरडे कपडे ठेवण्याच्या दिशांना महत्त्व दिलं जातं. स्वच्छ कपड्यांसाठी उत्तर किंवा पूर्व दिशा शुभ मानली जाते. ईशान्य, उत्तर आणि पूर्व दिशेला घाणेरडे कपडे ठेवण्याबाबतच्या धार्मिक मान्यता आणि वास्तुशास्त्रातील नियम जाणून घ्या.
Clothes Storage Vastu
Clothes Storage Vastusaam tv
Published On: 

घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं प्रत्येकाला आवडतं. मात्र अनेकदा घाईच्या नादात आपण कपडे कुठेही ठेवतो. काही वेळा कपडे जागेवर न ठेवता तसेच टाकून देतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात कपडे कोणत्या दिशेला ठेवले जातात, याचाही आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, असं मानलं जातं.

कपडे योग्य दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मकता टिकून राहतं, अशी धार्मिक मान्यता आहे. याउलट कपडे अस्ताव्यस्त ठेवल्याने घरात अस्वच्छता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे घरात कपडे ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊया.

Clothes Storage Vastu
Garud Puran: मृत्युनंतर मृतदेहाच्या नाकात आणि कानात कापूस घालण्याची प्रथा का आहे? गरूड पुराणात सांगितलंय रहस्य

स्वच्छ कपड्यांसाठी उत्तर किंवा पूर्व दिशा शुभ

वास्तुशास्त्रानुसार, स्वच्छ कपडे ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा चांगली मानली जाते. उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला कपडे ठेवल्याने धनाची बचत होण्यास आणि आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. तर दुसरीकडे

पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते. ही दिशा नवीन सुरुवात आणि ऊर्जेशी संबंधित आहे. त्यामुळे स्वच्छ कपडे ठेवण्यासाठी पूर्व दिशेलाही प्राधान्य दिलं जातं.

ईशान्य दिशेला घाणेरडे कपडे ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधली म्हणजेच ईशान्य दिशा महत्त्वाची मानली जाते. या दिशेचा संबंध बृहस्पती देवांशी जोडला जातो. बृहस्पती हे बुद्धी आणि चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या दिशेला घाणेरडे कपडे ठेवणं टाळावं, असं वास्तुशास्त्र सांगतं. ईशान्य दिशेला अस्वच्छ कपडे ठेवल्यास आरोग्याशी संबंधित अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे.

Clothes Storage Vastu
Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

उत्तर दिशेला घाणेरडे कपडे ठेवल्यास काय होतं?

उत्तर दिशा ही धन आणि संपत्तीची देवता कुबेर यांच्याशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या दिशेला घाणेरडे कपडे ठेवू नयेत, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. या दिशेला अस्वच्छ कपडे ठेवल्याने घरातील आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि धनसंपत्ती मिळवण्यात अडथळे येऊ शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

पूर्व दिशेला घाणेरडे कपडे ठेवणं टाळा

वास्तुशास्त्रात पूर्व दिशेला विशेष महत्त्व आहे. ही दिशा सूर्यदेवाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या दिशेला घाणेरडे कपडे ठेवणं टाळावं, असं सांगितलं जातं.

पूर्व दिशेला अस्वच्छ कपडे ठेवल्यास घरातील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिशेला कपडे ठेवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी.

Clothes Storage Vastu
Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.