Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Surabhi Jayashree Jagdish

saam tvमोबाईल चार्जर

मोबाईल चार्जरचा रोज वापर होत असल्याने कालांतराने तो खराब होऊ शकतो. चार्जरच्या केबलला तडे जाणं, पिन सैल होणं किंवा चार्जिंगमध्ये अडथळे येणं अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चार्जरची स्थिती वेळोवेळी तपासणं गरजेचं आहे.

Faulty mobile charger | saam tv

खराब होण्यापूर्वी काही लक्षणं दिसतात

चार्जर पूर्णपणे बंद पडण्यापूर्वी काही लक्षणं दिसू शकतात. मोबाईल हळू चार्ज होणं, चार्जिंग वारंवार बंद होणं किंवा चार्जर जास्त गरम होणं ही त्यापैकी काही लक्षणं आहेत.

Slow phone charging | saam tv

हळू चार्जिंग

मोबाईल नेहमीपेक्षा हळू चार्ज होत असेल तर चार्जर किंवा केबलमध्ये बिघाड असू शकतो. चार्जरमधील समस्येमुळे मोबाईलला योग्य प्रमाणात वीज मिळत नाही. मात्र बॅटरी किंवा चार्जिंग पोर्टमधील बिघाडामुळेही चार्जिंग हळू होऊ शकते.

Phone charging issues | saam tv

वारंवार कनेक्शन सुटणं

मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर वारंवार चार्जिंग सुरू आणि बंद होत असेल तर केबलमध्ये समस्या असू शकते. केबलच्या आतील तारा खराब झाल्यामुळे पुरवठा खंडित होऊ शकतो. मोबाईलचा चार्जिंग पोर्ट सैल झाल्यामुळेही असं होऊ शकतं.

Charger cable damage | saam tv

अतिरिक्त गरम होणं

मोबाईल चार्ज करताना चार्जर थोडा गरम होणं सामान्य आहे. मात्र चार्जर खूप गरम होत असेल तर त्यामध्ये बिघाड असण्याची शक्यता असते. अशा वेळी चार्जरचा वापर थांबवून तो तपासून घ्यावा.

saam tv

पिन सैल होणं

चार्जरची केबल किंवा मोबाईलला जोडली जाणारी पिन सैल झाली असेल तर चार्जिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. केबल काही प्रमाणात हलवली की चार्जिंग सुरू होणं किंवा बंद होणं ही त्याची लक्षण असू शकतात.

saam tv

स्पार्क किंवा आवाज येणं

चार्जर प्लगमध्ये लावताना ठिणग्या दिसत असतील किंवा त्यातून असामान्य आवाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. चार्जर, प्लग किंवा सॉकेटमध्ये बिघाड असल्यामुळे असं होऊ शकतं.

Mobile charger safety | saam tv

Refrigerator placement: घरात भिंतीपासून किती अंतराच्या दूर ठेवला पाहिजे फ्रीज?

येथे क्लिक करा