Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेनिमित्त कन्यारत्न प्राप्त झालंय; मग माता लक्ष्मीची 'ही' नावं चिमुकलीचं भाग्य उजळवतील

Akshaya Tritiya Mata Lakshmi Devi Names : आजच्या दिवशी लक्ष्मीच्या रूपाने खरोखर तुम्हाला कन्या रत्न प्राप्त झाले तर त्या चुमिलिकलीचे नाव माता लक्ष्मीच्या नावाने ठेवा.
Mata Lakshmi Devi Names
Akshaya Tritiya 2024Saam TV
Published On

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया या सणाला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्याचं मानलं जातं. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरी सुख शांती आणि धन संपत्ती नांदते असं म्हणतात. यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. आता लक्ष्मीच्या रूपाने तुमच्या घरी देखील एका गोंडस मुलीने जन्म घेतला तर? तिच्यासाठी आम्ही काही नावांची यादी सुचवली आहे.

Mata Lakshmi Devi Names
Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला दाखवा आमरस पोळीचा नैवेद्य, पाहा रेसिपी

लक्ष्मी देवीच्या नावाशी या नावांचा संबंध असणार आहे. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना जन्म देण्याआधी त्यांच्या नावांचा विचार करत असतात. आपल्या मुलाच्या वाटेला सुख, समृध्दी आणि धनसंपदा असावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आजच्या दिवशी लक्ष्मीच्या रूपाने खरोखर तुम्हाला कन्या रत्न प्राप्त झाले तर त्या चिमुकलीचे नाव माता लक्ष्मीच्या नावाने ठेवा.

आघिर्णा

अघिर्णा या नावाचा अर्थ आहे एक अजिंक्य शक्ती. म्हणजेच देवीचं एक रूप. त्यामुळे तुमच्या मुलीचं तुम्ही आघिर्णा हे नाव ठेवू शकता.

आयुधा

आयुधा या नावाचा देखील देवींच्या नावाशी अर्थ जुळतो. आयुधा म्हणजे दैवी शस्त्र होय. हे. नाव देखील मुलीसाठी भाग्यशाली आहे.

धन्या

धन्या या नावाचा अर्थ आहे भाग्यवान. धन्या या नावाचा आणखी एक अर्थ म्हणजे धन्य होय.

धृती

धृती म्हणजे दृढ विश्वास तसेच दृढ निश्चय होय. माता लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या मुलीचं हे नाव तुम्ही ठेवू शकता.

धृतांशा

तुम्हाला धृती हे नाव आवडलं नसेल पण त्याचा अर्थ आवडला असेल तर याच अर्थाचं तुम्ही दुसरं नाव ठेवू शकता. तुमच्या मुलीचं तुम्ही धृतांशा हे नाव ठेवू शकता.

द्विमात्रा

द्वैत आणि समतोल म्हणजे द्विमत्रा. तुमच्या तान्ह्या मुलीला तुम्ही या नावाने साद घालू शकता.

नारायणी

भगवान विष्णू यांना नारायण म्हटले जाते. तर त्यांच्या पत्नीला नारायणी असे काही ठिकाणी संबोधले जाते. त्यामुळे तुमच्या मुलीसाठी नारायणी हे नाव अत्यंत सुंदर आहे.

नवदुर्गा

नवदुर्गा म्हणजे साक्षात दुर्गा माता. तसेच दुर्गेच्या नऊ रुपांना देखील नवदुर्गा असे म्हटले जाते.

Mata Lakshmi Devi Names
Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेला आपल्या जोडीदाराला द्या सोन्याची वस्तू; दिवस होईल खास

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com