Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला दाखवा आमरस पोळीचा नैवेद्य, पाहा रेसिपी

Aamras Puran Poli Recipe : अशात अक्षय तृतीयेला घरातील देवांची पूजा करताना आमरस पोळीचा नैवेद्य केला जातो. त्यामुळे या नैवेद्याची रेसिपी झटपट जाणून घेऊ.
Aamras Puran Poli Recipe
Akshaya Tritiya 2024Saam TV
Published On

हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला फार महत्व आहे. या दिवशी सर्व व्यक्ती नवीन कामाची सुरुवात करतात. साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे.त्यामुळे या दिवशी अनेक व्यक्ती नवीन घर घेतात, पुजा करतात किंवा दागिने खरेदी करतात. अशात अक्षय तृतीयेला घरातील देवांची पूजा करताना आमरस पोळीचा नैवेद्य केला जातो. त्यामुळे या नैवेद्याची रेसिपी झटपट जाणून घेऊ.

Aamras Puran Poli Recipe
Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

पुरणपोळीसाठी साहित्य

चण्याची डाळ

गुळ

गहू आणि मैदा पीठ

पाणी

मीठ

कृती

सुरूवातीला चण्याची डाळ छान शिजवून घ्या. डाळ शिजत असताना त्यात गूळ अॅड करा. त्यानंतर हे मिश्रण थोडं कोमट झाल्यावर मस्त पुरण तरून घ्या. पुरण जास्त पातळ होऊनये यासाठी जेवढी डाळ असेल त्यापेक्षा दुप्पट पाणी टाकून डाळ शिजवा.

पुढे मैदा आणि गहू पीठाची मस्त कनीक मळून घ्या. ही कनीक १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर गोलाकार पोळी लाटून ती तव्यावर तूप लावून शेकून घ्या.

आमरस साहित्य

पिकलेले आंबे

साखर

गुळ

वेलची

मीठ

कृती

आमरस बनवताना आधी आंब्याच्या साली काढून घ्या. त्यानंतर सर्व गर एका टोपात काढून त्यातील कोय देखील पाण्याने धुवून घ्या. पुढे हा सर्व गर मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर तयार आमरसमध्ये साखर किंवा गुळ मिक्स करा. यामध्ये स्वादानुसार मीठ आणि वेलची पूड देखील अॅड करा.

Aamras Puran Poli Recipe
Hydrate Foods : उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणारच नाही! डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com