Akki Roti Recipe: सकाळच्या नाश्ताला काही वेगळं करायचंय? तर अक्की रोटी अन् नारळाची चटणी एकदा करून पाहाच

South Indian Breakfast: सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत अक्की रोटी हा उत्तम पर्याय आहे. तांदळाच्या पिठापासून झटपट तयार होणारी ही डिश नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास परिवाराला नक्कीच आवडेल. पौष्टिक, चविष्ट आणि सोपी रेसिपी.
Akki Roti Recipe
South Indian Breakfastgoogle
Published On

सकाळच्या नाश्त्यात रोज कांदे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आलाय का? मग आज काहीतरी वेगळं आणि चविष्ट ट्राय करा. दक्षिण भारतातील प्रसिद्ध आणि झटपट तयार होणारी क्रिस्पी वेज अक्की रोटी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी तेलात बनणारी आणि पोटभरणारी ही डिश घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. विशेष म्हणजे बाहेरगावी राहणाऱ्यांसाठी किंवा कामाच्या घाईत असणाऱ्यांसाठी ही रेसिपी खूपच सोपी आणि वेळ वाचवणारी आहे.

अक्की रोटी बनवण्यासाठी एका भांड्यात एक कप तांदळाचे पीठ घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप किसलेले गाजर, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, अर्धा छोटा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य छान एकत्र करा.

आवडीनुसार तुम्ही कोबी, ढोबळी मिरची किंवा इतर भाज्याही यात मिसळू शकता. त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या. पीठ खूप कडक होणार नाही याची काळजी घ्या.

Akki Roti Recipe
Shiv Jayanti 2026 Wishes: चारी दिशांत ज्याचा गाजावाजा, एकच होता असा राजा...; शिवजयंतीनिमित्त पाठवा ‘या’ मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छा

आता प्लास्टिक शीट किंवा केळीच्या पानावर थोडंसं तेल लावा. तयार पिठाचे छोटे गोळे घेऊन हाताने हलक्या हाताने थापत पातळ आकार द्या. मध्ये छोटे छिद्र करा, त्यामुळे रोटी नीट शिजते. गरम तव्यावर थोडं तेल लावून ही रोटी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

गरमागरम अक्की रोटी दही, नारळाची चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत सर्व्ह करा. एकदा ही चव चाखली की रोजच्या नाश्त्यात याच डिशची मागणी होईल. मुलांच्या डब्यासाठीही हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे.

Akki Roti Recipe
Makhana Smoothie Recipe: वजन होईल कमी झटक्यात कमी; पौष्टीक मखाना-फ्रूट प्रोटीन स्मूदीची वाचा सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com