Air India Recruitment 2023 : १० पास तरुणांसाठी गोल्डन चान्स! एअर इंडियामध्ये पदभरती, आजच करा अर्ज

Air India Bharti 2023 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये भरतीची प्रक्रिया सुरु आहे.
Air India Recruitment 2023
Air India Recruitment 2023Saam Tv
Published On: 

Air India Recruitment 2023 Online Application Process:

१० वी पास झालेल्या तरुणांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये भरतीची प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लगेच अर्ज करा.

एअर इंडियामध्ये ३३३ हँडीमेन आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आला आहे. या पदाची भरती प्रक्रिया ही ३ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु झाली आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकता.

या रिक्त पदाची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२३ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी aiasl.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज (Application) करु शकता. तसेच अर्ज शुल्कामध्ये ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी (Fees) आकारली जाणार नाही.

Air India Recruitment 2023
ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1000 पदांची भरती, कसा कराल अर्ज?

ज्युनिअर ऑफिसर टेक्निल पदासाठी ५ जागा रिक्त असून १७ ऑक्टोबरला वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. इंटरव्ह्यू सेंटरमध्ये कोचीनची निवड करण्यात आली आहे. तसेच हा इंटरव्ह्यू (Interview) सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे.

Air India Recruitment 2023
Budget Friendly Hotel In Nashik: नाशिकमध्ये कपल्ससाठी बजेट फ्रेंडली हॉटेल्स; कमी खर्चात बेस्ट पर्याय

तसेच यामध्ये विविध पदांसाठी विविध ठिकाणी इंटरव्ह्यू सेंटर देण्यात आले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत साइट्ला भेट देऊ शकता. या पदभरतीसाठी २८ ते ३० हजांरापर्यंत पगार मिळेल. तसेच उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे कमाल वय २८ पर्यंत असावे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांने अधिकृत साइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com