Surya Grahan 2026: १७ फेब्रुवारीला दिसणार सूर्याभोवती दिसणार फायर रिंग; भारतात पाहता येणार का हे ग्रहण?

Ring of fire solar eclipse India visibility: १७ फेब्रुवारी रोजी होणारे सूर्यग्रहण हे "रिंग ऑफ फायर" म्हणून ओळखले जाणारे दुर्मिळ खगोलीय दृश्य असेल. या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असल्याने तो सूर्य पूर्णपणे झाकू शकणार नाही आणि सूर्याभोवती अग्निवलयासारखा प्रकाश दिसेल.
Ring of fire solar eclipse India visibility
Ring of fire solar eclipse India visibilitySAAM TV
Published On

यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी होणार आहे. ते महाशिवरात्रीच्या बरोबर दोन दिवसांनी होणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असून रिंग ऑफ फायर असचं म्हणतात.

हे सूर्यग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार, दुपारी ३:२६ वाजता सुरू होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७:५७ वाजता हे ग्रहण संपणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. जगातील अनेक भागात हे दिसणार असून ते तुम्ही कसं पाहू शकता हे पाहूयात.

Ring of fire solar eclipse India visibility
Gajkesari Rajyog: मिथुन राशीत बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार अचानक पैसा

आकाशात दिसणार फायर रिंग

हे एक विशेष ग्रहण मानलं जातं. ज्यामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. परंतु त्यावेळी तो पृथ्वीपासून सर्वात दूर असल्याने तो सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. अशावेळी सूर्याभोवती एक चमकदार अग्निचं वलय तयार होतं. याला फायर रिंग असंही म्हणतात.

कुठे दिसणार हे ग्रहण?

कंकणाकृती अवस्था (रिंग ऑफ फायर) फक्त अंटार्क्टिकामध्येच दिसणार आहे. दक्षिण आफ्रिका, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे, लेसोथो, चिली, कोमोरोस, इस्वातिनी (स्वाझीलंड), मादागास्कर, मलावी, मॉरिशस, मायोट, मोझांबिक, नामिबिया आणि रियुनियन बेटांवरही काही प्रमाणात हे ग्रहण दिसून येणार आहे.

Ring of fire solar eclipse India visibility
Shadashtak Yog: सूर्य-गुरुच्या षडाष्टक योगामुळे 'या' राशी होणार मालामाल; 'या' राशींचं नशीब फळफळणार

कसं बघाल हे सूर्यग्रहण?

  • शास्त्रज्ञांच्या मते, उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहणं अत्यंत धोकादायक असू शकतं. असं केल्याने डोळ्यांना नुकसान होऊ शकतं.

  • ग्रहण पाहण्यासाठी विशेष सौर फिल्टर ग्लासेस किंवा प्रोटेक्टिव टूल्स वापरणं महत्वाचं आहे. कॅमेरा, दुर्बिणी किंवा टेलिस्कोपने पाहताना सोलर फिल्टर वापरा.

  • भारतात सूर्यग्रहण दिसणार नसलं तरी, टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही ते थेट पाहू शकता. नासा सूर्य आणि चंद्रग्रहणांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करते. त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता.

Ring of fire solar eclipse India visibility
Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगाने या राशींचं नशीब रातोरात पालटणार; सूर्य आणि गुरु देणार भरभरून पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com