Ganesh Visarjan 2023: अडीच दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन; या चुका चुकूनही करु नका

Ganpati Bappa Visarjan : घरगुती बाप्पाचे किंवा अडीच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन हे आज होईल.
Ganesh Visarjan 2023
Ganesh Visarjan 2023Saam Tv

Ganpati Bappa Visarjan:

भाद्रपद महिना सुरु झाला की, वेध लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. यंदा गणेशोत्सवाचा हा काळ १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर आहे. लाडक्या बाप्पाचे आपण सारेच जण विधी पूर्वक आणि मनोभावे पूजा करतात.

लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यात मोदक-लाडूचा प्रसाद हमखास असतो. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सणा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मोठ्या गणपतीचे विसर्जन हे १० दिवसांनी होते तर घरगुती बाप्पाचे किंवा अडीच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन हे आज होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ganesh Visarjan 2023
Mumbai's Ganesh Mandal: लालबागचा राजा, गणेश गल्ली..., मुंबईतील गणपतीचे दर्शन करायचे आहे? या पर्यायी मार्गाचा वापर करा

गणपती (Ganpati) बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला जातो. नदी, तलावात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. आज अडीच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाईल. या दरम्यान आपल्याकडून अशा अनेक चुका होतो. ज्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी.

1. मूर्तीचे विसर्जन करताना या गोष्टींचे ही विसर्जन करा

गणपतीच्या पूजेमध्ये (Puja) असलेले पान, सुपापी, दुर्वा, नारळ आणि इतर ज्या काही गोष्टी असतील त्याही विसर्जित कराव्यात. अनेकदा लोक बाप्पा जवळ ठेवलेला नारळ फोडतात, शास्त्रानुसार असे करणे अयोग्य मानले जाते. १० दिवस गणपतीजवळ ठेवलेल्या कलशामधली नारळ हा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. अशावेळी तो नारळ पाण्यात अर्पण करावा.

Ganesh Visarjan 2023
Sprouted Chana Benefits : महिनाभर खा मोड आलेले चणे, शरीराला मिळतील जबरदस्त फायदे

2. मूर्तीचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत

गणपतीची मूर्ती ही नदी, तलाव किंवा घरातील पाण्यात लगेच टाकू नये. हळूहळू मूर्तीचे विसर्जन करावे. ताबडतोब विसर्जन केल्यास मूर्ती खंडित होऊ शकते. जी अशुभ मानले जाते. घरामध्ये मूर्तीचे विसर्जन करत असाल तर मूर्ती बुडेल इतके पाणी घ्या. त्यानंतर हे पाणी झाडात ओतावे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com