Mumbai's Ganesh Mandal: लालबागचा राजा, गणेश गल्ली..., मुंबईतील गणपतीचे दर्शन करायचे आहे? या पर्यायी मार्गाचा वापर करा

5 Must Visit Ganesh Mandal In Mumbai : १० दिवस असणाऱ्या या गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या ठिकाणी थीमही ठेवली जाते.
Famous Gansh Mandals 2023
Famous Gansh Mandals 2023Saam Tv
Published On

How to Reach at Mumbai's Famous Ganesh Mandal:

मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा आणि उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेशोत्सव. १९ सप्टेंबरपासून घरोघरी आणि मोठ मोठ्या मंडळात गणेशाचे आगमन झाले. १० दिवस असणाऱ्या या गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या ठिकाणी थीमही ठेवली जाते.

यादरम्यान अनेक भक्तगण मुंबईतील गणपतीचे दर्शन करतात. बरेचदा आपल्याला दर्शनसाठी लांबलचक रांगा तर पाहायला मिळतात. परंतु, या ठिकाणी नेमके जायचे कसे हा प्रश्न पडतो. आम्ही तुम्हाला काही सोपे मार्ग सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मुंबईतील गणपतीचे दर्शन घेऊ शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

Famous Gansh Mandals 2023
Ganesh Chaturthi 2023 : श्रीमंत दगडूशेठसमोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण, ३५ हजार महिलांनी केली श्रीगणेशाची आराधना

1. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja)

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक, लालबागचा राजा. येथे अनेक सेलिब्रिटी आणि बॉलिवूड कलाकार येतात. लालबागच्या गणपतीचा फर्स्ट लुक मागच्या आठवड्यात मोठ्या धूमधडाक्यात अनावरण करण्यात आला. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येथे येतात. तुम्हालाही इथे जायचे असेल तर हा पर्याय मार्ग आहे.

कसे जाल?

  • रेल्वेने (Railway): लालबाग रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे मंडळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर आहे.

  • बसने: 47A, 126 आणि 129 सह अनेक बसेस या ठिकाणी थांबतात.

  • टॅक्सीनेः तुम्ही मुंबईत कुठूनही टॅक्सी घेऊन जाऊ शकता.

2. GSB सेवा मंडळ गणपती (किंग सर्कल)

GSB सेवा मंडळाची गणपतीची मूर्ती मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून ओळखली जाते. मूर्ती सोन्या (Gold)-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली असते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी या मूर्तीला 32 किलो चांदीचे दान मिळाले. यंदाच्या मूर्तीतील सोन्या-चांदीचा वापर अयोध्येतील राम मंदिराच्या गेटच्या बांधकामासाठी केला जाणार आहे.

Famous Gansh Mandals 2023
Ganesh Chaturthi 2023 : शुभ कार्यात पहिली पूजा श्रीगणेशाची का केली जाते? जाणून घ्या कारण

स्थळ: किंग्ज सर्कल

कसे पोहोचायचे?

  • रेल्वेनेः किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे मंडळाच्या अगदी जवळ आहे.

  • बसने: 41A, 126 आणि 129 सह अनेक बसेस येथे थांबतात.

  • टॅक्सीनेः तुम्ही मुंबईत कुठूनही टॅक्सी घेऊन जाऊ शकता.

3. मुंबईचा राजा

गणेश गल्ली मुंबईचा राजा 1928 मध्ये सुरू करण्यात आला. दरवर्षी येथे नाविन्यपूर्ण थीम आणि सजावट पाहायला मिळते. लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात.

ठिकाण : गणेश गल्ली

कसे पोहोचायचे?

  • रेल्वेनेः लालबाग रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे मंडळापासून सुमारे 1 किमी अंतरावर आहे.

  • बसने: 47A, 126 आणि 129 सह अनेक बसेस पंडालजवळ थांबतात.

  • टॅक्सीनेः तुम्ही मुंबईत कुठूनही टॅक्सी घेऊन येथे जाऊ शकता.

Famous Gansh Mandals 2023
Tea Side effects On Digestion: दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा पिताय? होऊ शकतो पचनसंस्थेवर परिणाम

4. अंधेरीचा राजा

अंधेरीचा राजा ही आर्थिक राजधानीतील सर्वात लोकप्रिय गणेश मूर्तींपैकी एक आहे. त्याचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होत नाही तर संकष्टी चतुर्दशीला होते.

स्थळः अंधेरी पश्चिम

कसे पोहोचायचे?

  • रेल्वेने: अंधेरी रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे मंडळापासून सुमारे 1 किमी अंतरावर आहे.

  • बसने: 129, 201 आणि 231 सह अनेक बसेस येथे थांबतात.

  • टॅक्सीनेः तुम्ही मुंबईत कुठूनही टॅक्सी घेऊन जाऊ शकता.

५. गिरगावचा राजा

निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने स्थापन केलेली 22 फूट गिरगावचा राजाची मूर्ती खास शाडूच्या मातीची आहे. ही मुंबईतील सर्वात इको-फ्रेंडली गणपती मूर्तीपैकी एक आहे.

Famous Gansh Mandals 2023
Ganesh Chaturthi 2023 Recipe : २४ तास मऊ राहतील उकडीचे मोदक, कळ्या फुटणारही नाही; पाहा बाप्पा स्पेशल रेसिपी

ठिकाण: गिरगाव

कसे पोहोचायचे?

  • रेल्वेनेः चर्नी रोड रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे मंडळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर आहे.

  • बसनेः 6, 171 आणि 202 सह अनेक बसेस याठिकाणी थांबतात.

  • टॅक्सीनेः तुम्ही मुंबईत कुठूनही टॅक्सी घेऊन जाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com