कोमल दामुद्रे
हल्ली प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवाती चहाच्या कपानेच होते. परंतु त्याचे प्रमाण योग्य नसले तर शरीरावर परिणाम होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. दिवसभरात फक्त एक किंवा दोन वेळा चहा प्यावा
अतिप्रमाणात चहा प्यायल्याने शरीरातील लोह शोषून घेतो. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो.
दिवसभरात जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने अॅनिमियाचा धोका वाढतो.
सतत चहा प्यायल्याने झोप कमी लागते परंतु, मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होतात.
चहामध्ये असलेले कॅफिन मेलाटोनिनवर परिणाम करतात. ज्याच्यामुळे झोपेत अडथळा येतो.
चहामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे हार्ट बर्नसारख्या समस्या उद्भवू शकतात.