लवकरच बारावीची परीक्षा सुरु होईल. अशातच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सुरुवात केली असेल. दहावी आणि बारावीच्या मुलांकडून पालकांना अधिक अपेक्षा असतात. त्यामुळे मुले देखील तितक्याच जोराने अभ्यास करतात.
दिवसभर अभ्यास करुन देखील मुलांच्या बरेचदा काही गोष्टी लक्षात राहात नाही. पालकांसह शिक्षक देखील मुलांना स्कोअरिंग करणाऱ्या विषयात अधिक लक्ष द्यायला सांगतात. बारावीच्या अभ्यासक्रमातील अर्थशास्त्र हा विषय अधिक स्कोअरिंगचा विषय मानला जातो. त्यात चांगले गुण मिळाले की, आपली टक्केवारी देखील चांगली होते. जर तुम्हालाही अर्थशास्त्राच्या पेपरात (exam) चांगले मार्क्स हवे असतील तर या टीप्स (Tips) लक्षात ठेवाच.
1. शॉर्टलिस्ट विषय
तुमच्यासाठी सगळ्यात सोपा आणि सहज लक्षात राहिल अशा टॉपिक्सला शॉर्टलिस्ट करा. तसेच तुम्ही शॉर्टलिस्ट केलेला चाप्टर किती मार्क्स मिळवून देऊ शकतो हे देखील पाहा. यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यास पुरेसा वेळ (Time) मिळेल. याआधीचे पेपर देखील एकदा वाचा
2. नोट्स बनवा
विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास करताना त्यांनी नोट्स बनवायला हवे. ज्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी अभ्यास करण्यास मदत होते. स्वत: बनवलेल्या नोट्स अधिक फायदेशीर ठरतात.
3. सँपल पेपर सोडवा
विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना जुने किंवा सॅपल पेपर सोडवा. त्यामुळे परीक्षेची पद्धत समजून घेण्यास मदत होईल. तसेच परीक्षेत पेपर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे देखील कळते.
4. वेळेचे व्यवस्थापन
विद्यार्थ्यांनी तयारी करताना सोडवलेले प्रश्न देखील तपासून पाहावे. यावरुन तुमची तयारी योग्य दिशेने सुरु आहे की, नाही हे कळते. तसेच तुम्ही किती वेळेत पेपर सोडवता हे देखील कळते.
5. परीक्षेची उत्तरे कशी लिहाल?
परीक्षेत प्रश्नांची उत्तरे देताना अनावश्यक गोष्टी लिहिणे टाळा. अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत उत्तरे लिहा. उत्तरे लिहिताना ती मुद्देशीर लिहावी. ज्यामुळे पेपर वेळेत सोडवता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.