संकटाशी लढण्यासाठी आत्मविश्वास असतो महत्त्वाचा; पण 'या' १० चुकांमुळे होतो व्यक्तीचा Low Confidence

Personality Development: जर तुम्हाला आत्मविश्वास वाटत नसेल आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे असे वाटत असेल, तर तुम्ही कोणत्या चुका करत आहात ज्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो हे जाणून घ्या.
Personality Development:
Low confidence often grows silently through daily habits — identify the mistakes and rebuild your self-belief.saam tv
Published On

लोक अनेकदा गर्दीत स्वतःला मागे ठेवतात. यशाच्या स्पर्धेत पराभव होईल म्हणून लोक स्पर्धेपासून दूर पळत असतात. हे आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे होत असते. पण आत्मविश्वासाचा अभाव कसा निर्माण होतो? आत्मविश्वास कमी असणे, मन अशांत होणे. आपण जे करतो ते सर्वकाही चुकीचे होत आहे, अशी भावना तुमच्या स्वतःच्या चुकांमुळे होत असते. ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सनी गर्ग यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी व्यक्तीचा आत्मविश्वास का कमी होतो, त्याची माहिती दिलीय. व्यक्तीचा आत्मविश्वास काही सवयींमुळे कमी होत असतो.

भूतकाळाबद्दल पश्चात्ताप

भूतकाळाबद्दल वारंवार पश्चात्ताप करू नका. पश्चात्तापाने जे घडले ते बदलणार नाही. ते स्वतःला त्रास देण्यासारखे आहे. तुम्ही त्यातून पुरेसे शिकलं असून आता तुम्हाला स्वतःला भूतकाळाचा विचार करून स्वत:ला शिक्षा देण्याची गरज नाहीये.

भविष्याबद्दलची काळजी

आपल्यातील अनेकजण भविष्यकाळाची चिंता करतात. ज्या गोष्टी घडणार आहेत त्यापैकी नव्वद टक्के गोष्टी घडत नाहीत, अशा विचार अनेकजण करत असतात. या विचारांनी अनेकांना झोप येत नाही. त्यांना निद्रानाशाची समस्या उद्धभवत असते. त्यामुळे त्यांचे कामावर नियंत्रण नसते, त्यांचा मूड खराब होत असतो.

दुसऱ्याचं सुख पाहून विचार करणं

दुसऱ्याच्या सुखाचा विचार करून नये, आपल्यातील अनेकजण आहेत, ते दुसऱ्याकडे असलेल्या वस्तूंचा, सुखांचा विचार करतात. त्या विचाराने ते अस्वस्थ होत असतात.

आपलं सामर्थ्य विसरणं

अनेकजण आपल्यातील दोष शोधत बसतात. ते स्वत: असलेल्या गुणांचा विचार करत नाहीत. बहुतेक जण स्वत: च्या उणिवा काढत बसतात. परंतु त्याऐवजी आपल्यात काही चांगले गुण आहेत. सकारात्मक गोष्टी काय आहेत. आपल्यातील सामर्थ्य काय आहे, याचा विचार केला पाहिजे.

Personality Development:
Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

तुलना करणं

तर काहींचा आत्मविश्वास हा इतरांशी तुलना करण्यामुळे कमी होत असतो. व्यक्तीने आपली तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करून नये. दुसऱ्यासोबत तुलना केल्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतो असा समज मनात तयार होत असतो. तसेच इतर व्यक्तीही आपल्याला अपयशी म्हणू लागतात.

ऑटोपायलटवर जगणे

ऑटोपायलट मोड आरामदायी आहे, तरीही धोकादायक आहे. यात तुम्ही वाढत नाही, पुढे जात नाही किंवा अपग्रेड करत नाही.

अतिविचार करणे

प्रत्येक निर्णयावर अतिविचार करणे चुकीचे आहे. अतिविचार केल्याने स्पष्टता येत नाही, ती फक्त गोष्टींना विलंब लावते. स्पष्टता कृतीतून येते, अतिविचारातून नाही.

स्वतःवर शंका घेणं

जीवनात आर्थिक नुकसान झालं किंवा एखादा निर्णय चुकला तर अनेकांना आपलं पुनरागमन करू शकत नाही किंवा परिस्थिती सुधारू शकत नाही असे वाटतं. पण तो विचार करू नका. योग्य झोप घ्या, व्यायाम करा, तुमचे आर्थिक व्यवस्थापन करा. तुम्ही पुनरागमन कराल.

Personality Development:
वयाच्या ४० व्या वर्षी महिला अचानक जास्त रोमँटिक का होतात? जाणून घ्या त्यामागील सत्य

वेळेचं कारण दाखवणं

आपण बहुतेकवेळा म्हणतो की, माझ्याकडे आता वेळ नाही. वेळ निघून गेली आहे. असा विचार करणं सोडून द्या, कोणती गोष्टी सुरू करण्याची सुंदर वेळ आज सारखी कधीच नव्हती, असा विचार करा. नेहमी मला ते करायचं होतं. काही बोलायचं होतं , ते बनायचं होतं आता वेळ नाही असा विचार करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com