वयाच्या ४० व्या वर्षी महिला अचानक जास्त रोमँटिक का होतात? जाणून घ्या त्यामागील सत्य

Romance in Women After Age 40: वयाच्या ४० व्या वर्षानंतर अनेक महिला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि अधिक रोमँटिक होत असतात. या बदलामागील मानसिक, भावनिक आणि जीवनशैलीचे सत्य काय हे जाणून घ्या.
Romance in Women After Age 40:
A confident woman in her 40s rediscovering love, emotional connection and self-confidence.saam tv
Published On
Summary
  • भावनिक परिपक्वता अधिक मजबूत होते

  • जबाबदाऱ्या कमी झाल्याने स्वतःसाठी वेळ मिळतो

  • नातेसंबंधांमध्ये नवीन उर्जा निर्माण होऊ शकते .

प्रेमासाठी वयाचं बंधन नसतं. कोणत्याही वयात प्रेम होऊ शकतं, असं म्हणत असतो. पण जेव्हा एखाद्या पुरुषाची पत्नी ४० वर्षांच्या वयानंतर अचानक पूर्वीपेक्षा जास्त रोमँटिक होत असली तर त्या व्यक्तीला जबर धक्का बसेन यात शंका नाही. बहुतेकवेळा स्त्री आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगण्यात घालवत असते. वर्षानुवर्षे जबाबदाऱ्या आणि दैनंदिन कामांमध्ये गुंतलेलेल्या असतात. त्याच स्त्रिया जर अचानक भावनिक जवळीक निर्माण करू लागतात. त्यावेळी अनेक पुरुषांना प्रश्न पडू लागतो की हा बदल का होतोय.

४० वर्षांनंतर महिलांच्या जीवनात कोणते बदल होतात?

या वयापर्यंत महिलांचे जीवन अधिक स्थिर झालेले असते. मुले मोठी झालेली असतात. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे पूर्वीसारखे कमी झालेले असते. त्याचमुळे या काळात महिलांना त्यांना स्वत: ला समजण्यासाठी आणि आपल्या भावानांचे ऐकण्यासाठी वेळ देणं पसंत करतात. त्यांना आई किंवा कुटुंबाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेपुरते मर्यादित ठेवायचे नसते. तर त्यांना त्यांचे नाते एक जोडीदार म्हणूनही अनुभवायचे असते.

Romance in Women After Age 40:
Sleep Tips : झोपा झटपट पटापट! वेळेवर झोपण्याचे ४ असे फायदे की आजार आसपासही फिरकणार नाहीत

हार्मोनल बदल आणि भावनिक जवळीक

वैद्यकीयदृष्ट्या महिलांच्या शरीरात वयाच्या ४० व्या वर्षी हार्मोनल बदल जाणवू लागतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्समधील चढ-उतार भावनांना अधिक तीव्र बनवत असतात. या टप्प्यात भावनिक संबंधाची इच्छा वाढत असते. जोडीदाराशी जवळीक साधण्याची इच्छा वाढते हे नैसर्गिक असते. त्यामुळेच तर या वयात पूर्वीपेक्षा जास्त प्रेमसंबंध दिसून येतात.

स्वत:साठी जगण्याची इच्छा

या काळात अनेक महिलांना असे वाटते की त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ इतरांसाठी जगले आहे. मुलांचे संगोपन, घरातील जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षा यामध्ये त्या अनेकदा स्वतःला मागे सोडत असतात. त्यामुळे ४० व्या वर्षांनंतर जेव्हा त्यांना थोडा मोकळा वेळ आणि मानसिक शांती मिळते, तेव्हा त्या पुन्हा त्यांच्या नातेसंबंधांना महत्त्व देऊ लागतात. त्यांचे पती त्यांचे सर्वात सुरक्षित आणि सर्वात विश्वासू भागीदार बनत असतात. ज्यांच्यासोबत त्यांना त्यांच्या भावना उघडपणे शेअर करायच्या असतात.

Romance in Women After Age 40:
Winter lethargy: थंडीच्या दिवसात सकाळी उठताना शरीर साथ का देत नाही? सुस्ती नाही तर डॉक्टरांनी सांगितली ६ कारणं

या वयात अनेक जोडपी एकत्र वेळ घालवण्यासाठी नव नवीन प्लान बनवत असतात. प्रवास करणे, बोलणे आणि कोणत्याही दबावाशिवाय एकत्र राहणे त्यांना जुन्या दिवसांची आठवण करून देत असते. हा बदल कोणत्याही असामान्य वर्तनाचे संकेत देत नाही, तर नात्यातील परिपक्वता दर्शवत असतो. जिथे प्रेम देखाव्याच्या पलीकडे जाते आणि समजूतदारपणा आणि आपलेपणाचे बनत असते.

वय वाढत असताना प्रेमसंबंध ठेवणे चुकीचे आहे का?

समाजात अजूनही अशी धारणा आहे की एका विशिष्ट वयानंतर जोडप्यांनी भावनिक किंवा रोमँटिक होऊ नये. पण वास्तव अगदी वेगळे आहे. वय वाढत असताना प्रेम अधिकच घट्ट होत जाते. या काळात प्रेमसंबंध गोंधळलेले नसून शांत, सुरक्षित आणि भावनिकतेने भरलेले असते, जे नाते मजबूत करते.

पतीने हा बदल कसा समजून घ्यावा?

जर ४० वर्षांनंतर पत्नी अधिक प्रेम आणि जवळीक दाखवत असेल तर त्याकडे संशयाने पाहण्याची गरज नाही. तिच्या आयुष्यात होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक बदलांचा हा एक नैसर्गिक परिणाम असतो. या काळात समजून घेणे आणि आधार देणे तुमच्या नात्याला पुनरुज्जीवित करू शकतात.

हा काळ तुमच्या दोघांसाठी पुन्हा संपर्क साधण्याची आणि जवळीक साधण्याची संधी असू शकतो. पण याच काळात पुरुषांमध्ये संशय वृत्ती येत असते. वयाच्या ४० वर्षानंतर स्त्रिया या रोमँटिक होत असतात. बहुतेकवेळा पतीने त्यांचा तो कल समजू शकत नाहीत. त्याचमुळे प्रेमसंबंधाची वेगळे प्रकरणे समोर येऊ लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com